बांदा | राकेश परब : समाजात वावरत असताना आपली कर्तव्ये प्रामाणिक पार पाडणे यालाच समाजसेवा म्हणतात. वास्तविक पाहता युवक युवती मध्ये सेवाभाव निर्माण झाला पाहिजे.डॉ द. भि. खानोलकर म्हणजे सेवाभाव त्यांच्या या जनसेवा निधी मधून उत्तम कार्य केले जाते. आज जे पुरस्कार देण्यात आले त्यांची निवड खरोखरच उल्लेखनीय आहे. दहावी बारावी मध्ये कोकण राज्यात प्रथम असत मात्र ही एवढी हुशार मुले त्यानंतर मात्र मोठया प्रमाणात युपीएससी वा इतर क्षेत्रात दिसत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.समाजाला विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याचे काम जनसेवा निधी मार्फत केले जाते.असे प्रतिपादन पत्रकार शेखर सामंत यांनी केले.
यावेळी सामंत डाँ.द.भि. तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी ,बांदा या संस्थेमार्फ़त दिल्या जाणाऱ्या २०२२-२३ यावर्षीच्या पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी जि.प.केंद्रशाळा बांदा नं.१ येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ मिलिंद खानोलकर, पुरस्कारप्राप्त तेजस बांदिवडेकर, दीप्ती प्रभू,सुषमा केणी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. द .भि. खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर दीपप्रज्वलनाने अध्यक्ष शेखर सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जनसेवा निधीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण आदर्श प्राथमिक शिक्षिक पुरस्कार पुर्ण प्राथमिक शाळा वजराट नं.१(वेगुर्ला) प्रशाळेचे शिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर, माध्यमिक आदर्श शिक्षिका पुरस्कार श्री देवी सातेरी हायस्कूल,वेतोरे च्या शिक्षिका दिप्ती मोतीराम प्रभू यांना, तर एक क्रियाशील आदर्श समाजसेवक पुरस्कार कणकवली येथिल सुषमा दयानंद केणी,सुरेश गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामंत पुढे म्हणाले, मला डॉ द भि खानोलकर यांचा सेवाभाव ऐकून होता. मात्र त्यांच्या या जनसेवा निधी मधून सुद्धा त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम आपण सर्वजण करत आहात.हे कौतुकास्पद आहे विशेष म्हणजे ज्यांचे समाजासाठी उत्तम काम सुरू आहे त्यांची पुरस्कारासाठी योग्य निवड करण्यात आली. या कार्यक्रमात असलेली शिस्तसुद्धा वाखाण्याजोगी आहे .
तर आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक (माध्यमिक विभाग) पुरस्कार सिंधुदुर्ग सैनिक स्कुल व ज्युनिअर काँलेज,आंबोलीचे प्राचार्य सुरेश तुकाराम गावडे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष तरुण भारतचे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी पुरस्कारप्राप्त बांदिवडेकर, प्रभू, केणी व गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.तर जनसेवा निधी मार्फत पुरस्कारासाठी निवड केल्याने आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे, सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी तर आभारप्रदर्शन गुरुनाथ नार्वेकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ अरविंद खानोलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, दिलीप फडके, हेमंत खानोलकर, सुधीर शिरसाट, सुनील नाटेकर, बंड्या नार्वेकर, मंगेश कामत, गणेश गर्दे, प्रेमानंद नाडकर्णी, राजू तावडे, तुळशीदास धामापूरकर, श्री वावळीये, अच्युत पिळणकर, जे डी पाटील, सतीश येडवे, डॉ संजय सावळ, डॉ भालचंद्र कोकाटे, शंकर नार्वेकर आदीसह बांदा सह इतर भागातून ग्रामस्थ उपस्थित होते.