वाघोसेवाडी-नवजीवन मित्र मंडळाने केले सन्मानीत.
वाघोसेवाडी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या पाच वर्षाच्या कार्यतत्पर यशस्वी कारकिर्दीबद्धल बहाल केला गेला पुरस्कार.

देवेंद्र गावडे | उपसंपादक :
नेरूर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्री. शेखर गावडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकाळाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत.
यादरम्यान बजावलेली कार्यतत्परता व स्वच्छ यशस्वी कारकिर्द याबद्धल वाघोसेवाडी येथील नवजीवन मित्र मंडळ व ग्रामस्थांनी मावळते सरपंच श्री. शेखर गावडे यांना ‘कार्यभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानीत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश हळदणकर, उपसरपंच श्री समद मुजावर, ग्रामपंचायत सदस्या सौ.माया शृंगारे, श्री.रामचंद्र शृंगारे, वाघोसेवाडी शाळेचे मुख्याधापक श्री.प्रसाद कुंटे, ग्राम.सदस्य प्रवीण नेरुरकर, ग्राम.सदस्य मंजुनाथ फडके,अमोल शृंगारे, श्रीकृष्ण ठाकुर व सहदेव पालकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सरपंच शेखर गावडे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.