अरुण पालव ,ऍड नंदकिशोर पालव व ग्रामपंचायत बिळवस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेला उपक्रम
मसुरे | प्रतिनिधी : बिळवस गावचे सुपुत्र अरुण सूर्यकांत पालव व ऍड नंदकिशोर धाकू पालव व ग्रामपंचायत बिळवस यांच्या संयुक्त विध्यमाने बिळवस गावातील बिळवस, आंगणेवाडी, भोगलेवाडी या तिन्ही महसुली गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर बॉटल व प्रत्येक व्यक्तीस मास्कचे वाटप करण्यात आले. बिळवस ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांच्या हस्ते सदर साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच सौ मानसी पालव, सदस्य संतोष पालव सदस्या सौ रंजना पालव व ग्रामस्थ उपस्थित होते. आंगणेवाडी येथे सरपंच सौ मानसी पालव, उपसरपंच सौ समीक्षा आंगणे, सदस्य संजय सनये, ग्रामसेवक युगलकिशोर प्रभुगावकर आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले. भोगलेवाडी येथे सरपंच सौ मानसी पालव व सदस्य सौ चैताली भोगले यांच्या सह ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आल्याचे यावेळी बिळवस हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी सांगितले. अरुण सूर्यकांत पालव व ऍड नंदकिशोर धाकू पालव यांच्या सहकार्याबद्दल ग्रामपंचायत बिळवसच्या वतीने सरपंच सौ मानसी पालव यांनी आभार मानले.
स्तुत उपक्रम, अभिनंदन.