मुणगे परिसरांवर शोककळा
मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील प्रसिद्ध तबला व मृदुंग वादक केशव (तात्या) पांडुरंग आडकर (९२ वर्ष) यांचे निधन झाले. त्यांना लहान पणापासून तबला वादनाची आवड होती. प्रसिद्ध संगीतकार डॉ. पोळाजी यांना त्यांनी साथ दिली होती. आडबंदरचे बुवा कै. विष्णू कांदळगावकर यांनादेखिल त्यांनी संगीत साथ दिली होती. आचरा येथील श्री रामेश्वर मंदिर येथे सुद्धा त्यांनी सेवा दिली होती.
पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री दिलीप, पुरूषोत्तम व हरीश आडकर यांचे ते वडील होत. केशव आडकर यांच्या निधनाने एक सच्चे संगीताचे सेवक सर्वांना सोडून गेले म्हणून हळहळ व्यक्त होत आहे.