साथी बापूभाई शिरोडकर पुण्यतिथी निमित्त आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी :
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे स्वातंत्र्यसैनिक तथा मालवण प. स. चे माजी सभापती बापूभाई शिरोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अंगणवाडीतील मुलांच्या बडबडगीत व गोष्ट सांगणे या स्पर्धा संपन्न झाल्या. बालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
दीपक भोगटे यानी बापूभाईंच्या निस्वार्थी व सेवाभावी वृत्तीचा पालकाना परिचय करून दिला व बापूभाईना लहान मुले अतिशय आवडत असल्याने हा अंगणवाडीच्या मुलांचा मेळावा आयोजित केला आहे असं सांगितलं.कट्टा, कुसरवे, गोळवण, वाईरकरवाडी, नांदोस, काराणेवाडी, गुरामवाडी,डॉन बॉस्को इत्यादी अंगणवाडीतील ४५ मुले या स्पर्धेत सहभागी झाली होती.

या समारंभास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, काळसेकर सर, सुजाता पावसकर, गिरकर मॅडम, नाईक मॅडम, जाधव मॅडम, अंगणवाडी सेविका व पालक उपस्थित होते.