मसुरे | प्रतिनिधी :
गोवा येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथाॅन स्पर्धेत ब्युटीच ऑन व्हीलस ग्रुपचे डॉ श्री.सोमनाथ परब यांनी फुल मॅराथाॅन ४२किमी पूर्ण केली .तसेच या ग्रुपचे दुसरे सदस्य श्री.रूपेश भोजणे.यांनी २१ किमी हाफ मॅरेथॉन पूर्ण केली.या निमित्ताने श्री .रमेश गावडे.आणि ओम गणेश साई मंगल हाॅल चे मालक श्री मामा माडये यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ब्युटीज ऑन व्हीलस ग्रुपचे सदस्य डॉ.सावंत,बंडू मांडये , निलेश हडकर ,सतीश कांबळी, गणेश पारकर, सोनू पारकर,रुपेश भोजणे,दुर्गेश मंडळ, अमेय चव्हाण,अमन बिरमोळे,अनिल पाटील,अमित सावंत, राजेश प्रभुलकर, नवनीत परब, चैतन्य प्रभुलकर, श्राव्य झाटये,सुरेश कांबळी, निलेश झाटये, प्रकाश सरमळकर, सौ.झाटये,सौ.माडये,सौ.गावडे आदी उपस्थित होते.