मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्यातील आघाडीचे वृत्त निवेदक आणि पत्रकार श्री.ॠषी श्रीकांत देसाई यांना अटल प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.
वृत्तनिवेदन,विवेचन आणि लेखन यामुळे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणातून महाराष्ट्र राज्याच्या घराघरांत पोहोचलेल्या ॠषी श्रीकांत देसाई यांना पत्रकारितेत राज्य , जिल्हा व सामाजीक स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आता अटल प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तर्फे जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे मालवण शहर, तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.