शिडवणे क्रीडानगरीत खेळाडूंचा जल्लोष.
विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट :
प्रतिवर्षीप्रमाणे केंद्रस्तर क्रीडास्पर्धा झाल्यानंतर प्रभागाच्या क्रीडास्पर्धा घेण्यात येतात. यावर्षी शिडवणे नं.१ शाळेच्या भव्य क्रीडांगणावर तळेरे प्रभागातील शेर्पे, खारेपाटण, साळीस्ते, कासार्डे केंद्रातील विजेत्या खेळाडूंच्या प्रभागस्तरीय स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाल्या.
त्यावेळी कणकवली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, बंडू कोकाटे, शेर्पे कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार, खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल, माजी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, प्रभाग मुख्याध्यापिका पद्मजा करंदीकर, प्रदिप श्रावणकर, सत्यवान घाडीगांवकर, शिडवणे नं.१ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र धुमाळ, दशरथ शिंगारे, विनायक जाधव, क्रीडाप्रमुख सत्यवान केसरकर, माजी अध्यक्ष दिनेश रांबा, मनोहर कोकाटे, प्रहार पत्रकार गुरुप्रसाद सावंत, शिडवणे नं.१ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
वेदांत कुडतरकर याने क्रीडाप्रतिज्ञा सांगितली. गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, क्रीडाप्रमुख सत्यवान केसरकर व उपक्रीडाप्रमुख अमोल भंडारी यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उपस्थित अधिकारी व शाळा सदस्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. खेळाडूंनी संपूर्ण मैदानात क्रीडाज्योत दौड केली.
क्रीडांगणावर सर्व प्रकारच्या मैदानी स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आल्या. उमेद फाऊंडेशनच्या वतीने उमेदियन जाकिर शेख यांनी प्रभागस्तरासाठी प्रथमोपचार पेटी प्रदान केली.
सर्व मैदानांचे नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तळेरे प्रभागातील पंच शिक्षक, संघ व्यवस्थापक शिक्षक आणि खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते. मैदानी सामन्यांच्या विजेत्यांना ट्रॉफी देऊन प्रभागाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रणय पाटील , तेली या आरोग्य अधिकारी यांनी सहाय्य केले. शिडवणे नं. १ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ व माता पालक संघाने केलेल्या सहकार्याबद्दल गटशिक्षणाधिकारी कणकवली यांनी विशेष आभार व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम विभुते यांनी केले.