मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील मैदानी खेळाचे बादशहा व माजी फेडरेशन रेफरी श्री.अशोक गणेश दाभोलकर-मेस्त्री व परिवारा तर्फे जि.प.शाळा वेतोरे क्र १ ला चॅम्पियन कॅरम बोर्ड भेट स्वरुपात देण्यात आला. नुकत्याच संपन्न झालेल्या श्री.दत्तजयंती दिवशी श्री.अशोक दाभोलकर यांचा वाढदिवस व त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस होता.
अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री.दाभोलकर व कुटुंबीय त्यांच्या घरातील प्रत्येकाचे वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरे करतात व तो खर्च सामाजीक,शैक्षणिक किंवा क्रीडाविषयक देणगी तथा भेट स्वरुपात एखाद्या संस्थेला किंवा शाळेला देतात.
यंदा श्री. अशोक दाभोलकर-मेस्त्री यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी जि.प.पू.प्रा. शाळा क्र १ दाभोली येथे महिला पालकांसाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
८ डिसेंबरला श्री. दत्तजयंतीच्या दिवशी वाढदिवस व लग्नाचा वाढदिवसा निमित्त चॅम्पियन कॅरम बोर्ड ( संपूर्ण संच ) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेतोरे क्र.१, वेंगुर्ला आईवडील कै. श्रीमती सुलभा गणेश दाभोलकर-मेस्त्री व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री ह्यांच्या स्मरणार्थ भेट केला.
त्यावेळी केंद्रप्रमुख श्री. नितिन कदम, मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर हरमलकर, उपशिक्षक श्री. विश्वनाथ जांभवडेकर, उपशिक्षका श्रीमती ममता धुरी , मिनल राणे , तसेच श्रीमती दिशा राठवळ उपस्थित होत्या. त्यांच्या ह्या सामाजिक जाणीवेबद्दल सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.