मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील सध्याचा सर्वात नूतन राजकीय पक्ष तथा पाॅलिटीकल ‘पार्टी’ म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पार्टी तथा पक्ष. जवळपास पाच महिने झालेल्या या पक्षाचा स्थानिक स्तरावर विस्तार करायचे प्रयत्न होत असताना देशाच्या मुलभूत स्तरावरील ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अस्तित्वाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री गणेशा झाला आहे .
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांच्या पत्नी शर्वरी वायंगणकर या पहिल्या ग्रा मपंचायत सदस्य ठरल्या आहेत.
‘बाळासाहेबांची शिवसेना’ सौ. शर्वरी शरद वायंगणकर यांची तळेरे ग्रा पं प्रभाग १ मधील ग्रा .पं. सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
सौ. शर्वरी वायंगणकर ह्या तळेरे प्रभाग १ मध्ये ग्रा. पं. सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सायली महाडीक यांचा अर्ज आज छाननीत बाद ठरला. त्यामुळे साहजिकच शर्वरी वायंगणकर यांची तळेरे ग्रा.पं.च्या प्रभाग १ मधून एकमेव नामनिर्देशन असल्यामुळे बिनविरोध निवड झाली आहे. सौ.शर्वरी वायंगणकर यांच्या रूपाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपला श्री गणेशा केल्यानंतर पक्षातील तथा पार्टीतील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्यात राजकीय यशाबद्दल व आगामी वाटचालीबद्दल “अभी तो ‘पार्टी’ शुरु हुई है” अशीच भावना सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. या यशाबद्दल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील उमेदवारांचेही मनोबल वाढेल अशी प्रतिक्रिया राजकीय तज्ञांनी व विश्वेषकांनी दिली असल्याचेही सूत्रांकडून समजते आहे.