23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

६ जानेवारीला पत्रकार दिनादिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचा उद्घाटन सोहळा होणार संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्यासह अनेक मान्यवर असणार उपस्थित..!

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. उमेश तोरसकर यांच्या नेतृत्वाखालील एक समिती मुंबईत जाऊन मान्यवरांना करणार  निमंत्रित..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची विशेष सभा कुडाळ येथील  विश्रामगृहावर संपन्न झाली. ६ जानेवारी २०२३ ला पत्रकार दिनाच्या निमित्ताने  सिंधुदुर्गमुख्यालय येथे सिंधुदर्ग सुपुत्र दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीचा
उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज पार पडलेल्या विशेष बैठकीमध्ये घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर,   मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, सचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत, उपाध्यक्ष बंटी केनवडेकर,महेश सरनाईक,बाळ खडपकर कार्यकारणी सदस्य दीपेश परब,राजन नाईक, हरिश्चंद्र पवार, संतोष राऊळ  यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाची एक समिती जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे जाऊन येथील मान्यवरांना निमंत्रित करणार आहे.
      
जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे मिळण्यासाठी संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांच्या हॉटेल आर एस एन, कुडाळ यांच्याकडे आपापली आधार कार्ड झेरॉक्स व फोटो यांच्याकडे १० डिसेंबर पर्यंत द्यायचे आहेत असा ठराव या बैठकीमध्ये आयत्याच्या विषयामध्ये घेण्यात आला. दरम्यान, ओळखपत्राशिवाय उद्घाटन कार्यक्रमास प्रवेश मिळणार नसल्यामुळे दिलेल्या तारखेला आपले ओळखपत्र साठी लागणारे कागदपत्र देण्याचे आवाहन अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले.
तसेच सभासदांनी आपली सभासद फी ३० डिसेंबर पर्यंत खजिनदार संतोष सावंत यांच्याकडे जमा करायची आहे असाही ठराव घेण्यात आला.या बैठकीमध्ये कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार संघाच्या या भवनासाठी लागणारी मदत आणि सहकार्य केल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला. संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राज्य पर्यटन समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला आला. त्याच बरोबर पत्रकार भवनांच्या स्वप्नपूर्तीचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचाही अभिनंदनचा ठराव संमत करण्यात आला.
या बैठकीमध्ये कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ,राजन नाईक, बंटी केनवडेकर, नंदकिशोर महाजन यांनी चर्चेत सहभाग घेतला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!