संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
लोकमान्य मल्टीर्पपज को- ऑफ सोसायटी लिमिटेड मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत शिरगांव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या स्पर्धेत शिरगांव हायस्कूल मधील एकूण ४७ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तेजस सुरेश सुतार, तन्वी धाकू फाले, तन्वी विशाल साटम, शुभम लक्ष्मण खरात या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांना उपस्थित मान्यवरांंच्या हस्ते भेेटवस्तु व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. व सहभाग विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरण समारंभप्रसंगी शाखा व्यवस्थापक परेश नातू,किरण नाईक मंदार माळवदे या प्रशालेचे प्राचार्य एस एन अत्तार , शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.