विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : दिनांक २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पंडित भीमसेन जोशी कलादालन पुणे येथे राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. हा सहभाग केवळ नाममात्र औपचारिकता न रहाता त्या सहभागाची संपूर्ण राज्यभर प्रशंसा होत आहे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायक अशी गोष्ट आहे.
या स्पर्धेत पारंपारीक गायन, तालवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, नाट्य, द्विमित चित्र, त्रिमित शिल्प, खेळणी बनवणे अशा विविध कला प्रकारांमध्ये नऊ विद्यार्थी सहभागी झाले. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणारे वराडकर हायस्कूल कट्टा हे एकमेव होते हे ही विशेषच.
प्रतिभा संपन्न असलेल्या विद्यार्थ्यांनी मनमोहक कलाकृती सादर केल्या. स्वतःच्या स्वतः रंगभूषा वेशभूषा करत अभिनय स्तरावर या सर्वांना आश्चर्यचकीत केले. लक्ष वेधून घेणारा गरुडाच्या वेशभूषेतील द्वितीज गवाणकर हा विद्यार्थी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. त्याला साथ देणारे अतिशय गोड आवाज असणारा पार्थ नलावडे, उत्तम पख़वाज वादन करणारा ओमकार राऊळ, झांज वादक अवधूत आचरेकर या सर्वांनी एकमेकांना सुंदर साथ देत. आपली दशावतारी पारंपारिक कला, तसेच पारंपारिक अभंग गायन, वादन या सर्वच बाबतीत रसिकांची मन जिंकली. प्रतीक्षा निळकंठ मेस्त्री खेळणी बनवणे या कलाप्रकारात उडणारे पक्षी बनवले. शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून भरतनाट्यम नृत्य सादर करत ग्रामीण भागातील विद्यार्थीही कोणापेक्षा कमी नाहीत याची प्रचिती साक्षी नाईक या विद्यार्थिनीने दिली.
‘वसुंधरा वाचवा व पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश देणार द्विमित चित्र रिया भगत या विद्यार्थिनी साकारले तसेच अवधूत आचरेकर या विद्यार्थ्याने त्रिमित शिल्पाच्या माध्यमातून हा संदेश दिला. मुलींच्या शिक्षणाबाबत ची जागरूकता निर्माण करणारे शिल्प ममता महेश आंगचेकर या विद्यार्थिनीने साकारले. ‘राजमाता जिजाऊ’ यांची यांची व्यक्तिरेखा पूर्वा रामदास चांदेकर ह्या विद्यार्थ्यांनीने साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
अतिशय सुंदर सादरीकरण, विषयातील कल्पकता या सर्वांमुळे कला उत्सवातील सहभागी असलेल्या एस.सी.आर.टी. चे टीम मेंबर्स विविध जिल्ह्यातून आलेले स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक या सर्वांनीच मुलांचे भरभरून कौतुक केले.
या सर्व टीमचे मार्गदर्शक व व्यवस्थापक म्हणून कलाशिक्षक समीर चांदरकर, सहाय्यक शिक्षक भूषण गावडे. तसेच श्री राजन पेंडूरकर यांनी सहकार्य केले. पुण्यासारख्या शहरात तीन दिवस दहा मंडळी सोबत निवास करणे म्हणजे खुपच खर्चिक बाब होती,पण ही समस्या मुख्याध्यापक नाईक सर यांचे आते भाऊ विनय मांजरेकर व त्यांची पत्नी सृष्टी मांजरेकर यांनी दूर केली. ग्रामीण भागातून अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होताना प्रवास खर्च राहण्याची, जेवणाची सोय, या खर्चिक बाबी असतात. परंतु कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा, चे.अध्यक्ष अजयराज वराडकर उपाध्यक्ष आनंद वराडकर सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ तसेच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे मुख्याध्यापक संजय सुभाष नाईक यांचे नेहमीच आर्थिक पाठबळ व सर्व प्रकारचे सहकार्य असते.
२०१६ पासून राज्यस्तरीय कला व स्पर्धेत वराडकर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाने आपला सहभाग दर्शवत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
कलाशिक्षक आणि महाराष्ट्र राज्यातील एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला उपासक समीर चांदेकर यांची ‘घडवणे’ या संकल्पनेवर ठाम निष्ठा आहे .कलाकृतीसोबतच आता त्यांचे विद्यार्थी सुद्धा कला अंगाने घडू लागले आहेत. सोबतच चांदेकर यांचे सहकारी, शाळेचे मुख्याध्यापक व इतर जणांचे सहकार्य यामुळे वराडकर हायस्कूलच्या कला भविष्याची ल पर्यायाने जिल्ह्यातील कला विकसनशीलतेची एक झलकच यंदा पुण्यात पहायला मिळाली.