बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टाचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी :
बॅ .नाथ पै .सेवांगण कट्टाच्या वतीने संविधान दिना निमित्त संविधान प्रश्नमंच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कट्टा परिसरातील ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रारंभी विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाऊ शिरोडकर यांनी भारतीय संविधाना विषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.दीपक भोगटे यांनी संविधान प्रश्नमंच स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

पूर्वा चांदरकर हिने आपल्या ओघवत्या शैलीत संविधान विषयी आपले मनोगत व्यक्त केले.वैष्णवी लाड यांनी संविधान निर्माण करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याची माहिती सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रश्नमंच स्पर्धेला वराडकर हायस्कूल कट्टा, सौ हि. भा. वरसकर विद्या मंदिर वराड, भ. ता. चव्हाण विद्यालय चौके,
न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर, श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे या हायस्कूलमधील
५२ विद्यार्थी सहभागी झाले.
प्रथम क्रमांक
तेजस्विनी परब (काळसे हायस्कूल), अंकिता राऊत (चौके हायस्कूल),
द्वितीय क्रमांक
सानिका धुरी( पेंडूर हायस्कूल),भक्ती आवळे गावकर (पेंडूर हाय),
प्रणिता परब (काळसे हायस्कूल),रिया परब ( काळसे हायस्कूल)
भाषा महाराव( काळसे हायस्कूल), प्रतिक्षा खोत (चौके हायस्कूल).
बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू व प्रशस्ती पत्रक तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, भाऊ शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, काळसेकर सर, श्रीधर गोधळी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
