30.5 C
Mālvan
Wednesday, May 7, 2025
IMG-20240531-WA0007

कट्टा परिसरातील १०० बालकांना स्वेटरचे वाटप..!

- Advertisement -
- Advertisement -

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या माध्यमातून वितरण.

मसुरे | प्रतिनिधी :

बॅ.नाथ पै सेवागण कट्टा, हडपीवाडी,कावळेवाडी, कुसरवे या ठिकाणी आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने सुमारे शंभर बालकांना स्वेटर वाटप करण्यात आले. सौ प्रतिभा हुल्याळकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

यावेळी वैष्णवी लाड म्हणाल्या, सौ प्रतिभा हुल्याळकर यांनी या थंडीमध्ये चांगल्या प्रतीची स्वेटर देऊन अनेक बालकाना मायेची पाखरच घातली आहे.त्या बद्दल सर्वानी त्यांचे व ज्यांच्यामुळे ही मदत आपणास मिळाली त्या रोटरीयन रश्मी पाटील यांच्याविषयी कृतज्ञ राहायला हवे. सेवांगणच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. आशा स्वयंसेविकांच्या समन्वयक
सौ .नाईक यानी सर्व बालक व पालक यांच्यावतीने सौ .प्रतिभा हुल्याळकर यांचे आभार मानले. व सेवांगण आता नवजात बालकांसाठी सुद्धा उपक्रम राबवतय याचा आनंद वाटतोय असे सांगितले. सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी श्रीमती हुल्याळकर यानी अत्यंत चांगल्या प्रतीची स्वेटर खास करून ग्रामीण भागातील बालकांसाठी दिली आहेत. त्यासाठी नेहमीच मुंबईहून कायमच मदत मिळवण्यासाठी तत्पर असणाच्या रश्मी पाटील यांच्यामार्फत देण्यात आली आहेत.प्रतिभा हुल्याळकर व रश्मी पाटील यांचे आभार मानून त्यानी यापुढेही वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळवण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले.यावेळी १०० बालकाना
स्वेटर, कानटोपी, विजार व बिस्किट पुडा भेट देण्यात आला.या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, सौ नाईक, सौ ढोलम, रीटा डान्टस, अंगणवाडी सेविका वेंगुलेकर, आपा परब, मिठबावकर, देवीदास गोंधळी, चंद्रकांत घोगळे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस व महिला उपस्थित होत्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या माध्यमातून वितरण.

मसुरे | प्रतिनिधी :

बॅ.नाथ पै सेवागण कट्टा, हडपीवाडी,कावळेवाडी, कुसरवे या ठिकाणी आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने सुमारे शंभर बालकांना स्वेटर वाटप करण्यात आले. सौ प्रतिभा हुल्याळकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

यावेळी वैष्णवी लाड म्हणाल्या, सौ प्रतिभा हुल्याळकर यांनी या थंडीमध्ये चांगल्या प्रतीची स्वेटर देऊन अनेक बालकाना मायेची पाखरच घातली आहे.त्या बद्दल सर्वानी त्यांचे व ज्यांच्यामुळे ही मदत आपणास मिळाली त्या रोटरीयन रश्मी पाटील यांच्याविषयी कृतज्ञ राहायला हवे. सेवांगणच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. आशा स्वयंसेविकांच्या समन्वयक
सौ .नाईक यानी सर्व बालक व पालक यांच्यावतीने सौ .प्रतिभा हुल्याळकर यांचे आभार मानले. व सेवांगण आता नवजात बालकांसाठी सुद्धा उपक्रम राबवतय याचा आनंद वाटतोय असे सांगितले. सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी श्रीमती हुल्याळकर यानी अत्यंत चांगल्या प्रतीची स्वेटर खास करून ग्रामीण भागातील बालकांसाठी दिली आहेत. त्यासाठी नेहमीच मुंबईहून कायमच मदत मिळवण्यासाठी तत्पर असणाच्या रश्मी पाटील यांच्यामार्फत देण्यात आली आहेत.प्रतिभा हुल्याळकर व रश्मी पाटील यांचे आभार मानून त्यानी यापुढेही वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळवण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले.यावेळी १०० बालकाना
स्वेटर, कानटोपी, विजार व बिस्किट पुडा भेट देण्यात आला.या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, सौ नाईक, सौ ढोलम, रीटा डान्टस, अंगणवाडी सेविका वेंगुलेकर, आपा परब, मिठबावकर, देवीदास गोंधळी, चंद्रकांत घोगळे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस व महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!