संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मालवण येथील श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था निर्मित “गराजलो रे गराजलो” या नाटकाद्वारे जनजागृती करता-करता १५ मुद्दे घेऊन निस्वार्थीपणे “गराजलो रे गराजलो” एक चळवळ सुरू केली आहे.आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत आणि या चळवळीचाच एक भाग म्हणजेच “लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र” भाग-२४६वा.या उपक्रमाअंतर्गत रविवार १३ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ठीक ०९.०० वाजता पत्रकार/निसर्गप्रेमी संजय खानविलकर यांची “लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र” मध्ये कु. बिंदिया मोहिते या मुलाखत घेणार आहेत.
तरी सर्वांनी ही मुलाखत अवश्य पहावी. तसेच आपल्या सर्व बांधवांनी याचा बोध घ्यावा, जागृत व्हावे आणि या चळवळीमध्ये सामिल होऊन आम्हाला सहकार्य करावे. तसेच प्रत्येक कोकणी माणसाने ही मुलाखत अवश्य पहावी. असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.