मसुरे | प्रतिनिधी :
ग्रामपंचायत २०२३-२४ जीपीडीपी (GPDP )पंधरावा वित्त आयोग आराखडा करण्यासाठी दहा ग्रामपंचायतींची गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा येथे बुधवारी संपन्न झाली. या कार्यक्रमास सुकळवाड तिरवडे नांदोस,गोळवण वरचीगुरामवाडी,वराड,
तळगाव,हेदूळ,खोटले,वायंगवडे या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,अंगणवाडी सेविका आशा सेविका,पोलिस पाटील आरोग्य सेवक, सेविका कृषी सहायक केंद्र चालक,ग्राम संघाचे अध्यक्ष ,कोषाध्यक्ष, सचिव ,सी .आर.पी इत्यादी ग्राम स्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शक म्हणून श्री.कृष्ण सावंत, केंद्रप्रमुख,श्री.गोसावी.केंद्रप्रमुख, श्री नारायण देशमुख, केंद्रप्रमुख, स्नेहल गावडे मुख्यसेविका यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जवळपास २०० जणांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मालवण यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.