मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील आणि भेटकार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
“विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच काही छंद जोपासावेत. आपल्यातील सुप्त कलेला वाव द्यावा. त्याचबरोबर ग्रंथालयाला नियमित भेट देऊन वाचनातून प्रगल्भ व्हावे,” असे आवाहन माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगावचे अध्यक्ष श्री. अरुण भोगले यांनी विद्यार्थ्यांना केले. दीपावलीनिमित्त ग्रंथालयाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना वाव देण्यासाठी माळगाव पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्तरीय आकाश कंदील आणि भेटकार्ड बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
या स्पर्धेला परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- १) आकाशकंदील स्पर्धा –
गट १) पहिली ते ४थी
प्रथम क्रमांक – तनुष गणेश पालव.
द्वितीय क्रमांक – सोहम सदाशिव पालव व रवी कृष्णा वंजारे.
तृतीय क्रमांक – यश संतोष नाईक व अद्वय अनिल भोगले.
उत्तेजनार्थ – निशिका निलेश पालव.
गट २) पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक – गणेश आनंद चौगुले.
द्वितीय क्रमांक – यशश्री गुरुनाथ ताम्हणकर.
तृतीय क्रमांक – स्वरा सुनील भोगले व मयुरेश ज्ञानदेव सावंत.
उत्तेजनार्थ – रिद्धी रवींद्र चव्हाण व शुभेच्छा संजय तावडे.
गट ३) आठवी ते दहावी
प्रथम क्रमांक – नित्या राजेश लब्दे.
द्वितीय क्रमांक -विघ्नेश वैभव खोत.
तृतीय क्रमांक – आर्या अनिल भोगले.
२) भेटकार्ड स्पर्धा –
गट १) पहिली ते ४थी
प्रथम क्रमांक – आर्या लक्ष्मण पालव.
द्वितीय क्रमांक – सोहम सदाशिव पालव.
तृतीय क्रमांक -अद्वय अनिल भोगले.
उत्तेजनार्थ – पियुषा राजेश लब्दे.
गट २) पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक – यशश्री गुरुनाथ ताम्हणकर.
द्वितीय क्रमांक -रिद्धी रवींद्र चव्हाण.
तृतीय क्रमांक -स्वरा सुनील भोगले.
उत्तेजनार्थ – स्वरा सचिन परब.
गट ३) आठवी ते दहावी
प्रथम क्रमांक – आर्या अनिल भोगले.
द्वितीय क्रमांक -नित्या राजेश लब्दे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री. अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, ग्रंथपाल तन्वी राणे, सदस्य अरुण वझे, चंद्रकांत माळकर, महादेव सुर्वे, शंकर चव्हाण, शितल मापारी यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे नियोजन छाया नाईक व मनाली परब यांनी केले.