श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाने दिली होती हाक.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावठणवाडी येथे आज, श्री.जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळातर्फे स्मशान परिसर स्वच्छता अभियान संपन्न झाले.


श्री.जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाच्या आवाहनाला पळसंब ग्रामस्थांनी व युवा वर्गाने उत्तम प्रतिसाद देऊन हे स्वच्छता अभियान यशस्वी केले.


या स्वच्छता अभियानात पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर , ग्राम सेवक सेवक अमित काबंळी, श्री. जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत ,अरुण पुजारे , सुरेश पुजारे ,राजन पुजारे ,बाळा पुजारे, प्रमोद सावंत, तात्या सावंत, किशोर सावंत, दाजी सावंत ,जुवेकर , हितेश सावंत, अमरेश पुजारे, शेखर पुजारे, अमित पुजारे, दादा पुजारे ,वैभव परब आणि गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.