28.6 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती व श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ चाफेड – भोगलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य खुली संगीत भजन स्पर्धा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -

गायगोठण गणपती मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : भजनामध्ये भगवंताचे नामस्मरण करताना सूरांशी एकरूप रहा, मेहनत घ्या. आपले शब्द श्रोत्यांपर्यंत पोहचले पाहिजेत याची काळजी घ्या. ग्रामीण भागात संगीत भजन कलेला चांगले व्यासपीठ मिळत आहे ही खरच आनंदाची गोष्ट असून याबद्दल चाफेड- भोगलेवाडी ग्रामस्थांचे खास अभिनंदन करत हा सामाजिक चांगला पायंडा असाच त्यांनी दरवर्षी चालू ठेवावा असे प्रतिपादन शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा जेष्ठ भजनी बुवा प्रा. विलासराव ऐनापुरे यांनी बोलताना व्यक्त केला.

चाफेड भोगलेवाडी येथे श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती व श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ चाफेड – भोगलेवाडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेत परीक्षक म्हणून ते बोलत होते. यावेळी दुसरे परीक्षक म्हणून कुडाळ चे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी चांगल्याप्रकारे काम पाहिले.

या स्पर्धेत कोंडये ( ता – कणकवली) येथील श्री पावनाई प्रासादिक भजन मंडळ, वरवडे ( कणकवली) येथील श्री भराडी देवी प्रासादिक भजन मंडळ, हुंबरणे ( कणकवली ) येथील श्री आकारी ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, किंजवडे ( देवगड ) येथील श्री गांगेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी ( कणकवली ) येथील श्री स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वर्दे ( कुडाळ ) येथील श्री दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, बिडवाडी ( कणकवली ) येथील श्री गांगेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ अशा ७ संघांनी सहभाग घेतला.
यात प्रथम क्रमांक – श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ ( वर्दे ) यांना रोख ५००१/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक – श्री आकारी ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ ( हुंबरणे) यांना रोख ३००१/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – श्री गांगेस्वर प्रासादिक भजन मंडळ ( किंजवडे ) यांना रोख २००१/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ म्हणून श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ( बिडवाडी ), उत्कृष्ठ गायन – बुवा- नरेंद्र मेस्त्री ( दत्तप्रसाद भजन मंडळ ),उत्कृष्ठ वादन – प्रशांत घाडी,(भरणी) उत्कृष्ठ कोरस – पावणाई प्रासादिक भजन मंडळ ( कोंडये ) यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम बक्षीस – पंढरीनाथ कांडर, द्वितीय बक्षीस – किरण मेस्त्री, तृतीय बक्षीस – संतोष भोगले तर सर्व प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी पुरस्कृत केली होती.यावेळी परीक्षक प्रा. विलासराव ऐनापुरे, कुडाळ चे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, आपली सिंधू नगरी न्युज चॅनेल चे ब्युरोचिफ संतोष साळसकर तसेच सर्व भजनी संघाचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष – पंढरीनाथ कांडर, उपाध्यक्ष – महेश भोगले, सचिव – सत्यवान भोगले, खजिनदार – सत्यवान कांडर, सरपंच सौ. संचीता भोगले, उपसरपंच सुनील धुरी, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील, पोलीस पाटील संतोष सावंत, माजी अध्यक्ष विजय परब, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख विजय भोगले, सौ. प्रियांका भोगले, वासुदेव परब, सुनील कांडर, माजी सरपंच संतोष साळसकर, प्रकाश भोगले, गावठण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर, भोगलेवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब, हनुमंत कांडर आदीसह ग्रामस्थ, श्रोतेवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

गायगोठण गणपती मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : भजनामध्ये भगवंताचे नामस्मरण करताना सूरांशी एकरूप रहा, मेहनत घ्या. आपले शब्द श्रोत्यांपर्यंत पोहचले पाहिजेत याची काळजी घ्या. ग्रामीण भागात संगीत भजन कलेला चांगले व्यासपीठ मिळत आहे ही खरच आनंदाची गोष्ट असून याबद्दल चाफेड- भोगलेवाडी ग्रामस्थांचे खास अभिनंदन करत हा सामाजिक चांगला पायंडा असाच त्यांनी दरवर्षी चालू ठेवावा असे प्रतिपादन शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा जेष्ठ भजनी बुवा प्रा. विलासराव ऐनापुरे यांनी बोलताना व्यक्त केला.

चाफेड भोगलेवाडी येथे श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती व श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ चाफेड - भोगलेवाडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेत परीक्षक म्हणून ते बोलत होते. यावेळी दुसरे परीक्षक म्हणून कुडाळ चे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी चांगल्याप्रकारे काम पाहिले.

या स्पर्धेत कोंडये ( ता - कणकवली) येथील श्री पावनाई प्रासादिक भजन मंडळ, वरवडे ( कणकवली) येथील श्री भराडी देवी प्रासादिक भजन मंडळ, हुंबरणे ( कणकवली ) येथील श्री आकारी ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, किंजवडे ( देवगड ) येथील श्री गांगेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी ( कणकवली ) येथील श्री स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वर्दे ( कुडाळ ) येथील श्री दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, बिडवाडी ( कणकवली ) येथील श्री गांगेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ अशा ७ संघांनी सहभाग घेतला.
यात प्रथम क्रमांक - श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ ( वर्दे ) यांना रोख ५००१/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक - श्री आकारी ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ ( हुंबरणे) यांना रोख ३००१/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक - श्री गांगेस्वर प्रासादिक भजन मंडळ ( किंजवडे ) यांना रोख २००१/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ म्हणून श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ( बिडवाडी ), उत्कृष्ठ गायन - बुवा- नरेंद्र मेस्त्री ( दत्तप्रसाद भजन मंडळ ),उत्कृष्ठ वादन - प्रशांत घाडी,(भरणी) उत्कृष्ठ कोरस - पावणाई प्रासादिक भजन मंडळ ( कोंडये ) यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम बक्षीस - पंढरीनाथ कांडर, द्वितीय बक्षीस - किरण मेस्त्री, तृतीय बक्षीस - संतोष भोगले तर सर्व प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी पुरस्कृत केली होती.यावेळी परीक्षक प्रा. विलासराव ऐनापुरे, कुडाळ चे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, आपली सिंधू नगरी न्युज चॅनेल चे ब्युरोचिफ संतोष साळसकर तसेच सर्व भजनी संघाचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष - पंढरीनाथ कांडर, उपाध्यक्ष - महेश भोगले, सचिव - सत्यवान भोगले, खजिनदार - सत्यवान कांडर, सरपंच सौ. संचीता भोगले, उपसरपंच सुनील धुरी, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील, पोलीस पाटील संतोष सावंत, माजी अध्यक्ष विजय परब, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख विजय भोगले, सौ. प्रियांका भोगले, वासुदेव परब, सुनील कांडर, माजी सरपंच संतोष साळसकर, प्रकाश भोगले, गावठण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर, भोगलेवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब, हनुमंत कांडर आदीसह ग्रामस्थ, श्रोतेवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी केले.

error: Content is protected !!