मुंबई | राकेश परब :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंबिवली येथे गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या “सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळ,डोबिंवलीच्या कार्यकारी मंडळावर डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री.उल्हास बाबाजी देसाई यांची बहुमताने मंडळाच्या वार्षिक सभेत “कार्यकारीणीवर” निवड करण्यात आली आहे.
.सदर निवड मार्च २०२४ पर्यंत आहे.या निवडीमुळे डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुरूनाथ देसाई यांनी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव अंधारी,उपाध्यक्ष श्री.गोविंद म्हाडगुत व सचिव ज्ञानेश्वर सावंत यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
उल्हास देसाई हे सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील असून त्यांना सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची आवड त्यांच्या लहानपणा पासूनच आहे.त्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांनी सर्व प्रथम ते रहात असलेल्या आपल्या मुंबईस्थित वाडीतील तरुणांना एकत्र करुन ४० वर्षापूर्वी “डेगवे-आंबेखणवाडी युवक मंडळ,मुंबईची” स्थापना करून त्या माध्यमातून सामाजिक कार्यास प्रारंभ केला आहे.ते त्या मंडळाचे एक संस्थापक सदस्य असून मंडळ स्थापने पासून सरचिटणीस पदाची धुरा यशस्वी पणे आजपर्यंत संभाळीत आहेत.
शिवाय डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे गेली कित्येक वर्षे कार्यकारीणी सदस्य, सहचिटणीस या पदावर काम करीत १५वर्षे चिटणीस, तर २० वर्षे सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. ते एक अभ्यासु व संयमी असून संस्थेचे संस्थापक व सरचिटणीस स्व.शांताराम देसाई यांच्या व इतर सहकारी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.डेगवे गावात व मुंबईत विविध उपक्रम मा.संस्थाध्यक्ष तथा विलेपार्लेचे माजी आमदार श्री गुरूनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत
.सदर संस्था संचलित डेगवे गावातील “नंदादीप”वाचनालयाचे ते एक संस्थापक सदस्य असून त्या वाचनालयाच्या सह कार्यवाह,व कार्यवाह पदावर काम केले आहे।
त्यांना शासनाच्या प्रशासकीय कामाचा अनुभव आहे.शिवाय विविध लोकप्रतिनिधी बरोबर त्यांचे जवळचे संबंध आहेत.
अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या उल्हास देसाई यांना राज्य स्तरीय ग्रंथमित्र,समाज गौरव,समाज प्रबोधन,व स्मार्ट लिडर पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचा उचित गौरव झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे डेगवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आनंद व्यक्त करून त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.