सहा सप्टेंबर
१५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.
१८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.
१९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.
१९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
१९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.
१९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.
१९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.