28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मसुरे येथे मालवण तालुका पत्रकार समिती पत्रकार पाल्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर व उपाध्यक्ष विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर व सदस्य महेश सरनाईक यांचाही झाला सत्कार.

माजी जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर आणि मर्डे सरपंच संदीप हडकर, ज्येष्ठ पत्रकार राजा खंडाळेकर, कुडाळ पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य रवी गावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलच्या सभागृहात ‘पत्रकार पाल्य’ गौरव तथा कौतुक सोहळा संपन्न झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उमेश तोरसकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर आणि मसुरे सरपंच संदीप हडकर हे सन्माननीय अतिथी होते.
मालवण तालुका पत्रकार संघातर्फे आयोजीत या अतिशय सुनियोजित सोहळ्यात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरसकर व उपाध्यक्ष विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर व महेश सरनाईक या पदाधिकार्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व अतिथींना मंचावर निमंत्रित केले गेले. प्रथम दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व सुमनांजली अर्पण करुन वंदन करण्यात आले.

मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संतोष गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकार कुटुंबियांचे तसेच पत्रकार बांधवांचे स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविकात त्यांनी पत्रकारीतेचे प्रेरणा व श्रद्धास्थान कै.बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन केले. त्यानंतर त्यांनी मालवण तालुका पत्रकार संघाची पत्रकारितेच्या व्यतिरिक्त असलेली समाज बांधिलकी व उपक्रमांची माहिती दिली.
त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार व मालवण पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले आणि पत्रकारांच्या मुलामुलींसाठी मालवण पत्रकार संघाने सुरु केलेल्या या व अशा उपक्रमांची प्रशंसा केली . समाजाभिमुख उपक्रमांची विशेषता असलेल्या मालवण तालुका पत्रकार संघाला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर मालवण तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष अर्जुन बापार्डेकर यांनी त्यांच्या भाषणात पत्रकारांच्या पाल्यांना शाबासकीची थाप मिळणे हे भविष्यासाठी गरजेचे आहे असे सांगितले.
कुडाळ पत्रकार संघाचे सदस्य रवी गावडे यांनी त्यांच्या भाषणात मालवण तालुका पत्रकार समितीचे विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मंचावर सन्मान करण्यात आला. बालवाडी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणार्या पत्रकार पाल्यांना यात सन्मानीत करण्यात आले.

यानंतर प्रमुख अतिथी माजी जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि लोकशाहीला तारक अशी आवश्यक पत्रकारीता मालवण तालुका पत्रकार समिती व जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य करत असल्याचे स्पष्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय पार्श्वभूमी बाजुला ठेवून आपण व आपला मसुरे गांव पत्रकार समितीला आवश्यक ते सहकार्य देईल असे त्यांनी प्रतिपादन केले. मर्डे सरपंच संदीप हडकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुढील कुठल्याही उपक्रम कार्यक्रमाचे यजमानपद मसुरे गांवाला मिळाले तरी आनंद होईल असे सांगताना सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी त्यांच्या पत्रकारीतेतील २५ वर्षांचा प्रवासात मालवण तालुका पत्रकार समिती व जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार बंधुंची कशी साथ लाभली ते स्पष्ट केले. पत्रकार कल्याण निधीसाठी त्यांनी ५,००० रुपयांचा निधी देणार असल्याचे स्पष्ट केले. पत्रकार बांधवाच्या समस्यांसाठी
अधिकाधीक सक्षम यंत्रणा तयार करायला आपली नेहमीच इच्छा असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेश सरनाईक यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी मालवण तालुका पत्रकार समिती ही त्यांची मातृसंस्था असल्याचे सांगितले. या पत्रकार समितीच्या व पत्रकार बंधुंच्या भरभराटीसाठी आपल्याला तीव्र इच्छेने सकारात्मक काहीतरी करायचे आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरसकर यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना अध्यक्षीय भाषणात पत्रकारांचे दैनंदिन जीवन आणि त्यांचे कष्ट याचा दाखला देऊन पत्रकारांच्या सर्वांगीण स्थैर्य व विकासासाठी आपण पूर्ण वेळ पत्रकारीतेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. समाजातील अनेक गोष्टींना प्रकाश झोतात आणणार्या पत्रकार बांधवांवर कठीण प्रसंग येतात तेंव्हा मात्र ते हतबल होऊ नयेत म्हणून पत्रकार कल्याण नीधीसाठी आपण प्रयत्न शील राहणारच हे स्पष्ट केले. पत्रकारांना निवृत्तीवेतन,कुटुंबियांचे आरोग्य याविषयीही त्यांनी जिल्हा पत्रकार संघाची व वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली. मालवण तालुका पत्रकार समितीतील पदाधिकारी व सदस्यांची त्यांनी विशेष प्रशंसा केली.

स्वतः जिल्हा अध्यक्ष श्री उमेश तोरसकर यांनी पत्रकार कल्याण निधीसाठी १ लाख रुपये दिलेले आहेतच अशी माहिती या दरम्यान मालवण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर व अर्जुन बापार्डेकर यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांचाही सत्कार आयोजीत केला गेला होता परंतु ते सध्या तालुक्याबाहेर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.

मसुरे गांवच्या वतीने मसुरे सरपंच संदीप हडकर यांनी मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संतोष गावडे यांचा सत्कार केला.

ज्येष्ठ पत्रकार सौगंधराज बादेकर यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन करताना मान्यवर, उपस्थित पत्रकार बांधव व कुटुंबियांशी संवाद समन्वय साधला.
या सोहळ्याला ध्वनी व्यवस्था व तांत्रिक मदत केलेले दिलीप परब,श्री. आशिष खोत व भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलचे कार्यालयीन कर्मचारी राजू प्रभूगांवकर यांचेही मंचावर निमंत्रीत करुन विशेष आभार मानले गेले.

या सोहळ्याला मालवण तालुका पत्रकार समितीचे सचिव श्री. कृष्णा ढोलम, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, आप्पा मालंडकर, संदीप बोडवे, कुणाल मांजरेकर, संतोष हिवाळेकर,नितीन आचरेकर, अनिल तोंडवळकर, सुधीर पडेलकर,भाऊ भोगले, नितीन गावडे,शैलेश मसुरकर व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

मालवण तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मंचावरील मान्यवर व सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी सभागृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चारिटेबल ट्रस्टचे आभार व्यक्त करण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर व उपाध्यक्ष विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर व सदस्य महेश सरनाईक यांचाही झाला सत्कार.

माजी जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर आणि मर्डे सरपंच संदीप हडकर, ज्येष्ठ पत्रकार राजा खंडाळेकर, कुडाळ पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य रवी गावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलच्या सभागृहात 'पत्रकार पाल्य' गौरव तथा कौतुक सोहळा संपन्न झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उमेश तोरसकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर आणि मसुरे सरपंच संदीप हडकर हे सन्माननीय अतिथी होते.
मालवण तालुका पत्रकार संघातर्फे आयोजीत या अतिशय सुनियोजित सोहळ्यात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरसकर व उपाध्यक्ष विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर व महेश सरनाईक या पदाधिकार्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व अतिथींना मंचावर निमंत्रित केले गेले. प्रथम दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व सुमनांजली अर्पण करुन वंदन करण्यात आले.

मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संतोष गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकार कुटुंबियांचे तसेच पत्रकार बांधवांचे स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविकात त्यांनी पत्रकारीतेचे प्रेरणा व श्रद्धास्थान कै.बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन केले. त्यानंतर त्यांनी मालवण तालुका पत्रकार संघाची पत्रकारितेच्या व्यतिरिक्त असलेली समाज बांधिलकी व उपक्रमांची माहिती दिली.
त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार व मालवण पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले आणि पत्रकारांच्या मुलामुलींसाठी मालवण पत्रकार संघाने सुरु केलेल्या या व अशा उपक्रमांची प्रशंसा केली . समाजाभिमुख उपक्रमांची विशेषता असलेल्या मालवण तालुका पत्रकार संघाला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर मालवण तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष अर्जुन बापार्डेकर यांनी त्यांच्या भाषणात पत्रकारांच्या पाल्यांना शाबासकीची थाप मिळणे हे भविष्यासाठी गरजेचे आहे असे सांगितले.
कुडाळ पत्रकार संघाचे सदस्य रवी गावडे यांनी त्यांच्या भाषणात मालवण तालुका पत्रकार समितीचे विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मंचावर सन्मान करण्यात आला. बालवाडी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणार्या पत्रकार पाल्यांना यात सन्मानीत करण्यात आले.

यानंतर प्रमुख अतिथी माजी जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि लोकशाहीला तारक अशी आवश्यक पत्रकारीता मालवण तालुका पत्रकार समिती व जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य करत असल्याचे स्पष्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय पार्श्वभूमी बाजुला ठेवून आपण व आपला मसुरे गांव पत्रकार समितीला आवश्यक ते सहकार्य देईल असे त्यांनी प्रतिपादन केले. मर्डे सरपंच संदीप हडकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुढील कुठल्याही उपक्रम कार्यक्रमाचे यजमानपद मसुरे गांवाला मिळाले तरी आनंद होईल असे सांगताना सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी त्यांच्या पत्रकारीतेतील २५ वर्षांचा प्रवासात मालवण तालुका पत्रकार समिती व जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार बंधुंची कशी साथ लाभली ते स्पष्ट केले. पत्रकार कल्याण निधीसाठी त्यांनी ५,००० रुपयांचा निधी देणार असल्याचे स्पष्ट केले. पत्रकार बांधवाच्या समस्यांसाठी
अधिकाधीक सक्षम यंत्रणा तयार करायला आपली नेहमीच इच्छा असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेश सरनाईक यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी मालवण तालुका पत्रकार समिती ही त्यांची मातृसंस्था असल्याचे सांगितले. या पत्रकार समितीच्या व पत्रकार बंधुंच्या भरभराटीसाठी आपल्याला तीव्र इच्छेने सकारात्मक काहीतरी करायचे आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरसकर यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना अध्यक्षीय भाषणात पत्रकारांचे दैनंदिन जीवन आणि त्यांचे कष्ट याचा दाखला देऊन पत्रकारांच्या सर्वांगीण स्थैर्य व विकासासाठी आपण पूर्ण वेळ पत्रकारीतेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. समाजातील अनेक गोष्टींना प्रकाश झोतात आणणार्या पत्रकार बांधवांवर कठीण प्रसंग येतात तेंव्हा मात्र ते हतबल होऊ नयेत म्हणून पत्रकार कल्याण नीधीसाठी आपण प्रयत्न शील राहणारच हे स्पष्ट केले. पत्रकारांना निवृत्तीवेतन,कुटुंबियांचे आरोग्य याविषयीही त्यांनी जिल्हा पत्रकार संघाची व वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली. मालवण तालुका पत्रकार समितीतील पदाधिकारी व सदस्यांची त्यांनी विशेष प्रशंसा केली.

स्वतः जिल्हा अध्यक्ष श्री उमेश तोरसकर यांनी पत्रकार कल्याण निधीसाठी १ लाख रुपये दिलेले आहेतच अशी माहिती या दरम्यान मालवण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर व अर्जुन बापार्डेकर यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांचाही सत्कार आयोजीत केला गेला होता परंतु ते सध्या तालुक्याबाहेर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.

मसुरे गांवच्या वतीने मसुरे सरपंच संदीप हडकर यांनी मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संतोष गावडे यांचा सत्कार केला.

ज्येष्ठ पत्रकार सौगंधराज बादेकर यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन करताना मान्यवर, उपस्थित पत्रकार बांधव व कुटुंबियांशी संवाद समन्वय साधला.
या सोहळ्याला ध्वनी व्यवस्था व तांत्रिक मदत केलेले दिलीप परब,श्री. आशिष खोत व भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलचे कार्यालयीन कर्मचारी राजू प्रभूगांवकर यांचेही मंचावर निमंत्रीत करुन विशेष आभार मानले गेले.

या सोहळ्याला मालवण तालुका पत्रकार समितीचे सचिव श्री. कृष्णा ढोलम, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, आप्पा मालंडकर, संदीप बोडवे, कुणाल मांजरेकर, संतोष हिवाळेकर,नितीन आचरेकर, अनिल तोंडवळकर, सुधीर पडेलकर,भाऊ भोगले, नितीन गावडे,शैलेश मसुरकर व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

मालवण तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मंचावरील मान्यवर व सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी सभागृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चारिटेबल ट्रस्टचे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!