24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुजीत जाधवांची सत्ताधारी नगरसेवकांवर सडकून टीका..!

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत , शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुजीत जाधव यांनी कणकवली नगरपंचायतमधील सत्ताधारी नगरसेवक विराज भोसले यांच्यावर सडकून टीका केली आहे .
एका प्रसिद्धी पत्राद्वारे टीका करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव यांनी विराज भोसले यांना कणकवलीतील जनतेची किती आस्था आहे हे सोनगेवाडीतील गार्डन कडे बघून चांगलेच लक्षात येत असल्याचे सांगितले आहे.
नगरसेवक विराज भोसले यांनी नगरपंचायत गार्डनसाठी अर्थातच लोकोपयोगासाठी स्वतःची अर्धा फूट जागा दिली नाही उलट त्यांनी ती अर्धा फूट जागा परत मिळवण्यासाठी तयार गार्डनचे नुकसान करायला भाग पाडले.
नगरसेवक विराज भोसले यांचा गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षण नावाखाली हडपण्याचा व स्वतःच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर च्या घशात घालण्यासाठी जनतेला विश्वासात न घेता सत्ताधारी केलेला प्रयत्न नगरसेवक व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उधळून लावल्यामुळे सर्वच सत्ताधारी सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत असे सुजीत जाधव यांनी प्रतिपादन केले आहे .
कणकवलीतील जनता आजही सत्ताधारी लोकांनी ‘रात्रीच्या अंधारात पाडलेल्या इमारती अजून विसरली नाही आहे ‘ असा टोला सुजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे लगावला आहे.

विराज भोसले यांनी स्वतः निवडून आलेल्या भागातील गार्डन बाबत बोलावे व जनतेच्या झालेल्या नुकसान कोण भरणार हे सांगावे असे आवाहन करताना सत्ताधारी लोकांनी नगरपंचायत सभेचे रेकॉर्डिंग समोर आणावे म्हणजे दुटप्पी भूमिका नेमके कोण घेते हे जनते समोर येईल असे शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुजीत जाधव प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत , शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुजीत जाधव यांनी कणकवली नगरपंचायतमधील सत्ताधारी नगरसेवक विराज भोसले यांच्यावर सडकून टीका केली आहे .
एका प्रसिद्धी पत्राद्वारे टीका करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव यांनी विराज भोसले यांना कणकवलीतील जनतेची किती आस्था आहे हे सोनगेवाडीतील गार्डन कडे बघून चांगलेच लक्षात येत असल्याचे सांगितले आहे.
नगरसेवक विराज भोसले यांनी नगरपंचायत गार्डनसाठी अर्थातच लोकोपयोगासाठी स्वतःची अर्धा फूट जागा दिली नाही उलट त्यांनी ती अर्धा फूट जागा परत मिळवण्यासाठी तयार गार्डनचे नुकसान करायला भाग पाडले.
नगरसेवक विराज भोसले यांचा गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षण नावाखाली हडपण्याचा व स्वतःच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर च्या घशात घालण्यासाठी जनतेला विश्वासात न घेता सत्ताधारी केलेला प्रयत्न नगरसेवक व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उधळून लावल्यामुळे सर्वच सत्ताधारी सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत असे सुजीत जाधव यांनी प्रतिपादन केले आहे .
कणकवलीतील जनता आजही सत्ताधारी लोकांनी 'रात्रीच्या अंधारात पाडलेल्या इमारती अजून विसरली नाही आहे ' असा टोला सुजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे लगावला आहे.

विराज भोसले यांनी स्वतः निवडून आलेल्या भागातील गार्डन बाबत बोलावे व जनतेच्या झालेल्या नुकसान कोण भरणार हे सांगावे असे आवाहन करताना सत्ताधारी लोकांनी नगरपंचायत सभेचे रेकॉर्डिंग समोर आणावे म्हणजे दुटप्पी भूमिका नेमके कोण घेते हे जनते समोर येईल असे शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुजीत जाधव प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

error: Content is protected !!