‘सिंधुदुर्गाच्या भविष्यकालीन आर्थिक विकासाच्या पाऊलवाटा’ विषयावर करणार मार्गदर्शन.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट: सिंधुदुर्गाचे सुपुत्र माजी खासदार सुरेश प्रभु यांच्या संकल्पनेतील सिंधुदुर्गाच्या भविष्यकालीन आर्थिक विकासाच्या पाऊलवाटा जाणून घेण्याचा हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघा तर्फे येत्या मंगळवारी (३०ॲागस्ट) त्यांच्या प्रकट मुलाखतीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.व्यापारी महासंघाच्या माध्यमातून कोविड काळात खास करून व्यापारी वर्गाच्या प्रबोधनासाठी सुरू करण्यात आलेल्या युट्यूब माध्यमी संवादा मालिकेचा पुढचा एक भाग म्हणून हे संवाद चित्रीकरण करण्यात येत आहे.
या संवादा दरम्यान माजी खासदार सुरेश प्रभुंशी जिल्हावासीयांना हितगुज साधावयाचे असल्यास किंवा काही प्रश्न-शंका विचारायच्या असल्यास त्यांनी आपले प्रश्न,म्हणणे महासंघाकडे ९४२२०५४५८८ / ९४२२३७३९८७ या क्रमांकावर सोमवार दि.२९ॲागष्ट पर्यंत वॅाटसअप करावेत,असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.