मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत कृषि प्रक्रिया जागृती पंधरवडा अंतर्गत वराड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले. या कार्यशाळेत सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी व जिल्हा संसाधन व्यक्ती जबक मालदार यांनी योजनेविषयी उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले व लाभार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी व्यासपिठावर तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी, ग्रामपंचायत सदस्या माधुरी मसुरकर, कृषि पर्यवेक्षक सिताराम परब, कृषि सहाय्यक सुषमा धामापूरकर आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील प्रक्रियादारांना प्रक्रिया व्यवसाय विस्तार करणे अथवा नव्याने अन्न प्रक्रिया करु इच्छिणा-या लाभार्थ्यांनी आपली प्राथमिक माहिती तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व्दारे प्रसारीत केलेल्या या https://forms.gle/bAFYY2Riy7fXzXE28 लिंकव्दारे गुगल फॉर्मवर भरुन सबमिट करण्याविषयीचे आवाहन तालुका कृषि अधिकारी मालवण विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.
सदर माहिती एकत्रित करुन पुढील कार्यवाहीसाठी नेमणूक झालेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांचेकडे देण्यात येईल.