एम.के.सी .एल.च्या २२ वा वर्धापनदिनी नेहरू सेंटर, वरळी-मुंबई येथे सन्मान..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
एम.के .सी.एल .चा २२ वा वर्धापनदिन नेहरू सेंटर, वरळी-मुंबई येथे नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून ९०० हून अधिक MKCL चे केंद्र समन्वयक व एम.के.सी.एल.चे व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे डॉ.अनंत सरदेशमुख.डॉ.चारुदत्त माई.
प्रोफेसर जे.बी.जोशी.डॉ.अनिल काकोडकर.डॉ.निशिगंधा वाड.तसेच MKCL चे जिल्हा समन्वयक, MKCL चे विभागीय समन्वयक प्रणय तेली यांच्या विशेष उपस्थितीत श्रावणी काॅम्प्युटर एज्युकेशन्स तळेरेला उत्कृष्ठ प्रशिक्षण संस्था म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

२०१३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला आज ९ वर्षे पूर्ण झाली.एक परिवार,एक कुटुंब म्हणून कार्य करणारी संस्था,गेल्या नऊ वर्षाच्या प्रगतशील वाटचालीचा प्रवास आहे.या यशाचे श्रेय हे फक्त एकट्याच नसून या संस्थेमध्ये आजवर काम करणारे प्रशिक्षक,येथून भरभरुन ज्ञान संपादन करुन डोळयात एक नवी उमेद नवा विश्वास घेऊन जाणारे विद्यार्थी यांचाही याच्यात मोलाचा वाटा आहे,
श्रावणी काॅम्प्युटर एज्युकेशन संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला शिकताना काहीही अडचणी येता नयेत, प्रत्येक विद्यार्थी हा अनुकूल वातावरणात शिकायला हवा हाच संस्थेचा नेहमीचा प्रयत्न असतो.शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र कंप्यूटर, इंटरनेटची सुविधा, उत्कृष्ट क्लासरुम, उत्कृष्ट बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करुन त्यांना पोषक असे वातावरण, या सुविधांबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहीत केले जाते.
संस्थेतील प्रत्येक व्यवस्था, सुविधा,विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त या प्रत्येक गोष्टीत विद्यार्थ्यांना कारणीभूत ठरतात.
स्वतःच्या प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे ध्येय उराशी बाळगून संस्थेची वाटचाल सुरु आहे.या संस्थेमध्ये येणारे विद्यार्थी हे बहुतांशी ग्रामीण भागातून असल्यामुळे त्यांच्यामध्ये संगणकीय ज्ञानाचा अभाव हा मोठया प्रमाणावर आहे. त्यासाठीच संस्थेमध्ये त्यांच्या मानसिकतेला समजून घेऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवतील असे ज्ञानाने परिपूर्ण असलेले तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांचे अभिप्राय, त्यांच्या समस्या, सूचनांची दखल घेऊन, त्यांच्या पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहितीही दिली जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी Personality Development आणि करिअर गाईडन्सचे सेमिनार्स घेतले जातात आणि याचेच फलित म्हणून ‘श्रावणी कंप्यूटर एज्यूकेशन्स’ मधून MKCL ची MOM(एम.के.सी.एल. ॲालिंपियाड मूव्हमेंट) ,महा IT Genius, महाजागृती यांसारख्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी राज्य, जिल्हा स्तरावर उज्वल यश संपादन करताना दिसतात.या यशात संस्थेच्या अविरत प्रयत्नांसोबत पंचक्रोशीतील कासार्डे,तळेरे,गवाणे,वारगाव, नाधवडे,खारेपाटण,मणचे,मुटाट,फणसगाव,पेंढरी,बापार्डे या विद्यालयांतील विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
२०१४ साली अर्थपूर्ण अणि प्रगतशील करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या युवांसाठी कमवा आणि शिका धर्तीवर MKCL चे जे अभिनव पदवी शिक्षण सुरू झाले, ज्यात BBA आणि B.Sc in CSA सुरु झाला आहे.त्या पदवी शिक्षणामध्ये सुध्दा संस्थेतील साधारण ४० हून अधिक विद्यार्थी मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या महानगरांमध्ये नामांकित कंपन्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत.ज्यामध्ये या विद्यार्थ्यांना (E-education+E-experience+E-earning) शिक्षण, इंडस्ट्री अनुभव आणि अर्निंग एकाच वेळेस अशा अनोख्या शिक्षण पद्धतीचा लाभ घेता आला ही अभिमानास्पद बाब आहे.
ग्रामीण भागातील मुलांमधील आत्मविश्वासाची कमतरता लक्षात घेऊन या मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा तसेच त्यांना करिअरच्या नवनव्या संधीची माहिती व्हावी, यासाठी डॉ.अनिल नेरूरकर M.D (अमेरिका), सिंधूभूमी फाऊंडेशन कासार्डे आणि श्रावणी कंप्यूटर्स गेली नऊ वर्षांमध्ये अनेकदा व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे निवासी शिबिरांचेही आयोजन करीत आहेत.यामध्ये पालकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अशाच प्रकारचे यथा शक्ती योगदान श्रावणी कंप्यूटर संस्था देत आहे.
२०१४ ते २०२२ या कार्यकाळात श्रावणी काॅम्प्युटर एज्युकेशन्सला सातत्याने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने MKCL कडून गौरविण्यात येत आहेच.परंतु २०१७ साली MKCL चे रोल मॉडेल सेंटर हा किताब आणि सन २०२२ साली MKCL च्या २२ व्या वर्धापन दिनाला राज्यातील निवडक केंद्राच्या सत्कार सोहळ्यातही या संस्थेची वर्णी लागावी ही सर्वोच्च मानाचे द्योतकच म्हणावे लागेल याचा हा सन्मान मिळाला आहे.
एम.के .सी.एल.चा २२ वा वर्धापनदिन नेहरू सेंटर, वरळी-मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून ९०० हून अधिक MKCL चे केंद्र समन्वयक व एमकेसीएलचे व्यव्स्थापकीय संचालक मंडळाचे डॉ.अनंत सरदेशमुख,डॉ.चारुदत्त माई,प्रोफेसर जे.बी.जोशी,डॉ.अनिल काकोडकर,डॉ. निशिगंधा वाड,तसेच MKCLचे जिल्हा समन्वयक, MKCL चे विभागीय समन्वयक प्रणय तेली यांच्या विशेष उपस्थितीत श्रावणी कंप्युटर एज्युकेशन्स तळेरेला उत्कृष्ठ प्रशिक्षण संस्था म्हणून गौरविण्यात आले.या पुरस्कार वितरण प्रसंगी श्रावणी संचालिका सौ.श्रावणी मदभावे तसेच संचालक सतिश मदभावे उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल श्रावणी काॅम्प्युटरच्या संचालिका सौ.श्रावणी मदभावे तसेच संचालक सतिश मदभावे यांचे सर स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
अभिनंदन