तीन दिवशीय मोफत मार्गदर्शन; नवउद्योजकांनादेखील संधी..!
सिंधुदुर्ग नगरी | प्रतिनिधी : कृषि व अन्नप्रक्रीया संचालनालय, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य याच्या अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय सिंधुदुर्ग आणि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुत विद्यमाने तीन दिवशीय मोफत अन्न व फळ प्रक्रियेवर आधारीत क्षमता बांधणी तथा उद्योजकता विकास कार्यक्रम प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे दिनांक 25/8/22ते दिनांक 27/8/22या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
ज्यांना फळ,अन्न प्रक्रियेवर आधारीत स्वत:चा व्यवसाय करायचा आहे अशांसाठी मोफत तज्ञ अधिकारी,उद्योग सल्लागार, याच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मार्गदर्शन सत्रासाठी किमान वय 18 पूर्ण,बेरोजगार युवक,युवती,महिला बचत गट,शेतकरी,भागिदारी संस्था,शेतकरी उत्पादक गट/कंपनी या प्राथमिक प्रशिक्षणात सहभागी होवू शकतात.
ज्यांना अन्न,फळ प्रक्रियेवर उद्योग करायचा आहे त्यांच्या उद्योग उभारणीसाठी,प्रकल्प अहवाल तयार करण्यास या योजने अंतर्गत मोफत मेन्टार (रिसोर्स पर्सन)उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्यांनी अन्न, फळ प्रक्रियेवर उद्योग करायचा ठाम निर्णय झाला आहे ते या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात.या योजने अंतर्गत 35/टक्के अनुदान कमाल 10 लाख मर्यादित ते असेल.
नव उद्योजकाला स्वताःची 10% ते 40%टक्के पर्यत स्व गुंतवणूक करणे या योजनेत नमूद केले असून उर्वरित बॅक कर्जाचा समावेश असेल.लाभार्थी हा बॅकेचा थक बाकीदार नसावा.
तीन दिवशीय क्षमता बांधणी तथा उद्योजकता विकास कार्यक्रम दि.25/8/2022ते 27/8/2022 या कालावधीत पूर्णवेळ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे नियोजित केला आहे.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थीना प्रती रू 500 ₹ स्टायपेंड देण्यात येणार असून प्रशिक्षण यशस्वीतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.