चिंदर येथील विशाल गोलतकर यांनी रेखाटली तिरंगामय रांगोळी.
चिंदर | विवेक परब :
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. अनेक कलाकार आपल्या कलाकारीतून अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिंदर येथील ख्यातनाम रांगोळीकार विशाल गोलतकर यांनी सावरकरांच्या प्रतिमेसह अमृत महोत्सवाच्या तिरंगामय शुभेच्छा आपल्या रांगोळी कलेतून स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला दिल्या आहेत. गोलतकर यांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवीलेली आहेत. त्यांच्या रांगोळीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.