27.3 C
Mālvan
Friday, May 9, 2025
IMG-20240531-WA0007

गवंडीवाड्यातील निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना मदतीचा हात.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण रिक्षा संघटनेच्या सेवाभावी सदस्यांची सामाजिक बांधिलकी ; पंचक्रोशीतून होतेय रिक्षा संघटनेची प्रशंसा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाड्यातील एक निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना मालवण पंचक्रोशी रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी मदतीचा हात दिला आहे.

गवंडीवाड्यातील राजश्री गावडे या एका पायाने दिव्यांगही असून त्या संपूर्ण निराधार असल्याचे समजताच रिक्षा संघटनेतील काही सदस्यांनी फारसा गाजावाजा न करता आज दुपारी त्यांना भेटून 11,251 रुपये एवढी आर्थिक मदत केली आहे.

रिक्षा संघटनेतील सदस्यांमध्ये अध्यक्ष पपू कद्रेकर,हेमंत कांदळकर,निलेश लुडबे,विद्या तांडेल,आंबेरकर,कांबळी,मनोज धुरी,गांवकर , आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संचालक व रिक्षा संघटनेतील सदस्य दिनेश किडये,राजाराम वाघ,गौरव कदम आणि काही अन्य सेवाभावी सदस्यांची ही सामाजिक बांधिलकी सध्या मालवणात प्रशंसेचा विषय आहे.

राजश्री तांडेल यांना एका वाहनाने ठोकर दिल्याने त्या अपंगावस्थेत आहेत हे समजल्यानंतर तत्काळ मदतीचा हात पुढे केलेले हे सर्व सदस्य आहेत.

यांवर अधिक आवाहन करताना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पपू कद्रेकर व हेमंत कांदळकर व सहकार्यांनी इतर सामाजिक संस्था व दानशूर लोकांनाही राजश्री गावडे यांना यथाशक्ती मदत करावी असे सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण रिक्षा संघटनेच्या सेवाभावी सदस्यांची सामाजिक बांधिलकी ; पंचक्रोशीतून होतेय रिक्षा संघटनेची प्रशंसा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाड्यातील एक निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना मालवण पंचक्रोशी रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी मदतीचा हात दिला आहे.

गवंडीवाड्यातील राजश्री गावडे या एका पायाने दिव्यांगही असून त्या संपूर्ण निराधार असल्याचे समजताच रिक्षा संघटनेतील काही सदस्यांनी फारसा गाजावाजा न करता आज दुपारी त्यांना भेटून 11,251 रुपये एवढी आर्थिक मदत केली आहे.

रिक्षा संघटनेतील सदस्यांमध्ये अध्यक्ष पपू कद्रेकर,हेमंत कांदळकर,निलेश लुडबे,विद्या तांडेल,आंबेरकर,कांबळी,मनोज धुरी,गांवकर , आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संचालक व रिक्षा संघटनेतील सदस्य दिनेश किडये,राजाराम वाघ,गौरव कदम आणि काही अन्य सेवाभावी सदस्यांची ही सामाजिक बांधिलकी सध्या मालवणात प्रशंसेचा विषय आहे.

राजश्री तांडेल यांना एका वाहनाने ठोकर दिल्याने त्या अपंगावस्थेत आहेत हे समजल्यानंतर तत्काळ मदतीचा हात पुढे केलेले हे सर्व सदस्य आहेत.

यांवर अधिक आवाहन करताना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पपू कद्रेकर व हेमंत कांदळकर व सहकार्यांनी इतर सामाजिक संस्था व दानशूर लोकांनाही राजश्री गावडे यांना यथाशक्ती मदत करावी असे सांगितले आहे.

error: Content is protected !!