26.6 C
Mālvan
Wednesday, May 7, 2025
IMG-20240531-WA0007

सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे ‘चला, थोडं मोकळं होऊया’ कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब :
येथील सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे ‘चला, थोडं मोकळं होऊया’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित शालेय व खुला गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आनंदी मी’ या विषयावर स्वानुभव लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त ७०० शब्द), ‘आनंदी मी’ या विषयावर कविता लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त २० ओळी), ‘आनंदी मी’ या विषयावर चित्र स्पर्धा (A 4 आकाराच्या कागदावर चित्र), ‘आनंदी मी’ या विषयावर व्हिडिओ स्वरूपात स्वगत स्पर्धा (जास्तीत जास्त ५ मिनिटे) असे विषय ठेवण्यात आले आहेत. सर्व स्पर्धांसाठी इयत्ता ५ वी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १२ वी, १८ ते २५ वर्षे व २५ वर्षांपुढील असे गट ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेच्या नियमानुसार स्वानुभव लेखन आणि कविता कागदाच्या एकाच बाजूवर लिहिलेले असावे. स्वानुभव लेखन, कविता लेखन यांच्या खाली आणि चित्राच्या मागच्या बाजूला खालील माहिती द्यावी. अन्यथा साहित्य स्वीकारले जाणार नाही. व्हिडिओच्या सुरूवातीला खालील माहिती सांगावी. त्याची वेळ व्हिडिओच्या वेळेत धरण्यात येणार नाही. प्रत्यक्ष स्वागत सुरूवात केल्यापासून व्हिडिओची वेळ धरण्यात येईल. स्पर्धकाचे नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोड सह), जन्मदिनांक, वय, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, स्पर्धकाची स्वाक्षरी, शाळेचे/कॉलेजचे नाव (केवळ पहिल्या तीन गटांना लागू), वर्गशिक्षक/मुख्याध्यापकांची स्वाक्षरी (केवळ पहिल्या दोन गटांना लागू). साहित्य किंवा व्हिडिओ पाठवण्याचा अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२२ आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण १० ऑक्टोबरच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमात करण्यात येईल. स्पर्धेसाठी व्हिडिओ मो. 9420880529 या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावा. लेखन साहित्य सहज ट्रस्ट, मन्नत बंगला, करोल वाडा, जुना बाजार, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
पिन : ४१६५१० या पत्त्यावर पाठवावे. शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचे, पालक – शिक्षकांचे साहित्य एकत्रित गोळा करून सामूहिक स्वरूपात एकाच लिफाफ्यातून पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी मीनाक्षी मो. 9420880529 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब :
येथील सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे 'चला, थोडं मोकळं होऊया' अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित शालेय व खुला गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
'आनंदी मी' या विषयावर स्वानुभव लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त ७०० शब्द), 'आनंदी मी' या विषयावर कविता लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त २० ओळी), 'आनंदी मी' या विषयावर चित्र स्पर्धा (A 4 आकाराच्या कागदावर चित्र), 'आनंदी मी' या विषयावर व्हिडिओ स्वरूपात स्वगत स्पर्धा (जास्तीत जास्त ५ मिनिटे) असे विषय ठेवण्यात आले आहेत. सर्व स्पर्धांसाठी इयत्ता ५ वी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १२ वी, १८ ते २५ वर्षे व २५ वर्षांपुढील असे गट ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेच्या नियमानुसार स्वानुभव लेखन आणि कविता कागदाच्या एकाच बाजूवर लिहिलेले असावे. स्वानुभव लेखन, कविता लेखन यांच्या खाली आणि चित्राच्या मागच्या बाजूला खालील माहिती द्यावी. अन्यथा साहित्य स्वीकारले जाणार नाही. व्हिडिओच्या सुरूवातीला खालील माहिती सांगावी. त्याची वेळ व्हिडिओच्या वेळेत धरण्यात येणार नाही. प्रत्यक्ष स्वागत सुरूवात केल्यापासून व्हिडिओची वेळ धरण्यात येईल. स्पर्धकाचे नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोड सह), जन्मदिनांक, वय, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, स्पर्धकाची स्वाक्षरी, शाळेचे/कॉलेजचे नाव (केवळ पहिल्या तीन गटांना लागू), वर्गशिक्षक/मुख्याध्यापकांची स्वाक्षरी (केवळ पहिल्या दोन गटांना लागू). साहित्य किंवा व्हिडिओ पाठवण्याचा अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२२ आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण १० ऑक्टोबरच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमात करण्यात येईल. स्पर्धेसाठी व्हिडिओ मो. 9420880529 या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावा. लेखन साहित्य सहज ट्रस्ट, मन्नत बंगला, करोल वाडा, जुना बाजार, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
पिन : ४१६५१० या पत्त्यावर पाठवावे. शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचे, पालक - शिक्षकांचे साहित्य एकत्रित गोळा करून सामूहिक स्वरूपात एकाच लिफाफ्यातून पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी मीनाक्षी मो. 9420880529 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!