24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणी_कथामालिका.

- Advertisement -
- Advertisement -

शिमगो…कोणाचोही घडू शकता.

माडीछपरी_फुल्ल_अधिकारी (काल्पनिक)

चौथो_भाग (एपिसोड: 4)

शिगम्याच्या सणाचे दिवस इले की माडी छपरातली वर्दळ वाढली म्हणान समजायची.
दिसभर निसता रणरणता निंबार म्हणजे ऊन..!
मध्येच कधी वारो ताठ आसलो तरी त्याका थंडावो म्हणान बिलकुल नाय…निसते गर्म्याचे वळवाटे नायतर गरम झळे..!

बंड्याशेठचा माडीछप्पर वायच मुख्य गावाबाहेर जरी आसला तरी ता दुसर्या अनेक गावांका जोडणार्या रस्त्यावरचा .
रोजच्या गिर्‍हाईक मानसांएवढोच अनोळखी मानसांचो वावर थय नेहमीचोच.
पण गाडिये नायतर मोटारसायकली थांबवून माडीयेचो आस्वाद घेवक थांबलेले कोणी थय फारशे सहज बसा शका नव्हते.
एकतर रोजच्या गिर्हाईकांची बडबड,गडबड आणि गर्दी आणि थेतूर अरुंदशा फळीयेंवर स्वतःक बाटले आणि ग्लासासकट सावरत बसणा ह्या सोप्या नसायचा.
रोजच्या मानसांका मात्र थयले कोने,सांधे सगळे यव्वस्थीत म्हायती होते त्यामुळे त्यांका बसताना तसो फारसो त्रास होई नाय होतो.
थय भुतूर छपरात सर्कस करुच्यापेक्षा ,पर्यटक वगैरे मंडळी सरळ तेंच्या तेंच्या गाडियेत बसून नायतर प्लास्टिकच्या बाटलेंची पार्सला घेऊन जाणा पसंद करीत.

अशेच एका तापलेल्या दुपारी रतनो,इठू,शैलो, आणि रोजच्यापैकीचे रमण,रवगो,संतो,गुरु,दत्तो वगैरे सातआठ जणा आपापली जागा पकडून माडी टाकुचो त्यांचो कार्यभार चालू करून बसलेले .
शिगम्याचे दिवस होते म्हणान संध्याकाळचेपण काही ‘माडीपटू’ सकाळपासनाच गळे वले करुन तयार आसायचेच.
पण तरी शिगम्याच्या नायतर होळीयेचा असा काय सनसनाटी घडा नाय होता.

स्वप्नो ह्या सगळ्यांका त्यांचो त्यांचो ब्रॅन्ड देवन स्वतः मोबाईलवाशी झालेलो .
कोणाक मोबायलात घुसान बसलेलो बघल्यानी काय इठू आणि रमणचा टाळक्या शाप सटका होता पन आवशी बापाशीविना असणार्या पोरक्या स्वप्न्याक काय बोलून सडसडावचो तेंचो धीर होत नाय कधिच.

“मन रमवुक बाबडो मोबायलात आसता”, असा हळूच ते रोज एकमेकांक सांगित पण तरिव खयतरी त्यांचा मोबायलाक बघल्यार खदखदत रवाच होता.

आता वायच एक बाटली दत्त्याच्या पोटात रिचली तशी त्याची जीभ सैल पडाक सुरवात झाली.
सगळ्यांकडे बघित दत्तो म्हणलो, ” होळीयेची कायएक मजा उरली नाय आता.
कोळीन,शबय हे फक्त शिगम्याचे दाखवचे सोपस्कार रवले हत.
अरे…वर्गणी पण देतंत ती आवझवारी फोनातना फोनात ..!
आजकालचे पोरय तसलेच..
एकेकाक दाढी काढूक लावुक पाचशे रुपये देवक होये.
जो उठता तो ‘कोहली’ बनान फिरता मग ‘कोळीन’ बनवुक दाढी भादरुची पाचश्याची फोडणी फुकटची..!
बरा ह्यांचो भर होळीयेक उपयोग शून्य. .
हेंच्यान कोनच्या परड्यातला माडाचो एक सुको तुटको पिडो नाय उचलुक जमाचो. …कित्या तर कोनी बगल्यान तर फोटो काढतलो आनि फेसबुकार टाकतलो. .
हाड….हेंच्यान काय एक होवचा नाय आणि आता आमच्यात तितक्या कायतरी करुचा शारिरीक घोपान नाय…!”

सगळ्यांका दत्त्याचा म्हणणा पटलेला पण त्या म्हणण्यामागचो त्याचो एक दुःखी सूरपण सगळ्यांका म्हायत होतो.
दत्तो हो पूर्वी वाड्यातल्या मंडळातल्या नाटकात कामा करी.
एक कलाकार म्हणून पुढे त्याका दशावतारात जावचा होता.
बाबी कळिंगन नायतर पार्सेकराच्या धयकाल्यात जावन काम शिकान त्यांच्या मंडळात रवाची तेची इच्छा होती.
पण दत्त्याच्या आवशीक आणि बापाशिक ता मान्य नव्हता.
आवशिन त्याका शप्पथ घातल्यान आणि दत्तानं धयकाल्याचा आणि अभिनयाचा स्वप्नंच नाईलाजान सोडून दिल्यान.
मग दरवर्षी तो शिगम्यात कोळणीचा सोंग घेवन ‘शबय’ घालुक लागलो.
शिगमो इलो की दत्त्याचा पिवचा प्रमाणय वाढत जाई.
दिसभर निसतो गांवभर कोळीण बनान त्वेषानं नाचून झाला काय संध्याकाळी मिळात ती दारु ढोसून ढोसून आवशी बापाशिच्या नावान मनोमन तो शिगमो घाली.
तो आवशी बापाशीक त्यांच्या हयातित पण कधी गाळी घालून बोललो नव्हतो पण त्याची तगमग,तडफड शिगम्याच्या मोसमात बाहेर येई…
शिगम्यात पिल्यान तरिव तो त्यांका त्वांड उघडून कधीच गाळी घाली नायच..
तो स्वतःकच मोठमोठ्यान गाळी घालित घराकडे जाई. .आणि रातभर नाटकात काम केलेले जुने फोटो बघित रडान रडान झोपान देई.
झिलाचा मन दुकावल्याचो आवशीक खूप नंतर पश्चाताप झालो खरो पण तवसर दत्त्याची पन्नाशी इलेली. ..दत्त्याच्या चाळीशीत बापुस गेलो पण जातानाय त्याका नाटक,धयकाल्यापासून लांब रव असा बजावीतच तो गेलो….
बापाशीक दत्त्याक धयकाल्यात न धाडल्याबद्दल कायम अभिमान होतो….एक अहंकारी अभिमान.

पुढे वयापरत्वे दत्त्यान कोळणिचा सोंगय घेवचा बंद केल्यान पण मेल्यान मनोमन अभिनयाशिच जुळवून घेतला आसल्याकारणान तो सोंगा तयार करुक आणि त्यांच्या तालमेक मदत करी.

पण ह्यावर्षी कायतरी नविनच प्रकार घडा होतो आणि तेचा दुःख दत्त्याच्या काळजात जास्ती होता.
आता नविन पोरगे मोबाईलाचो उपयोग करुन अभिनय शिका होते.
कपडे,मुकुट,दागिने,रंग वगैरे सगळे वस्तूपण मोबाईलातनाच येई होते.
वर्षातना आठ दिवस तरी दत्त्यातल्या अभिनय कलेक आणि नटराजाच्या अस्तित्वाक गांवभर मान आणि मागणी होती.
तालमिचे,कलेचे पैशे ,बिदागी तो कधिच घेई नाय होतो कारण त्याचा मजुरीचा गवंडीकाम आणि आंब्यारच्या फवारणेचा काम मिळान रोजचे हजार बाराशे रुपये तरी त्याका देई होता..!

दत्त्यान लगिन करुक नव्हता कारण त्याचा मन आधिच खच्चीकरण होवन कोमेजलेला फूल होता आणि तेच्यार आणखी कसली जबाबदारी पेलुची त्याच्यातली मानसिक ताकद तशी तरुण वयातच संपलेली ..
पुतणो,भाचो ह्यांच्यावांगडा तो कुटुंब नायतर लेकरांचा सुख घेई होतोच पण आता जो तो कसल्यातरी व्यापात ..!

तो शिगम्यातलो आठ दिवसाचो “रंगदेवतेचो आणि नटेश्वराचो” अगदी मनोभावे सेवेकरी होतो.
पण त्याच्या आत्म्याच्या श्वासाच्या शिगम्याच्या सणाक गेली दोनतीन वर्षा वायच झळ बसलेली आणि ह्यावर्षी तर त्याका शिगम्याचा असा कायच काम नव्हता. …
ही खरी सुई दत्त्याच्या काळजाक टोचा होती…!

गेली दोनतीन वर्षा त्याना देशी,इंग्लिश दारु बंद करुन माडियेकडे मोर्चो वळवलेल्यान.
ह्या वर्षिचे हे शिगम्याचे आठ दिवस त्याका अक्षरशः नरकयातना देई होते.
आत्ताय बोलता बोलता जवळपास तीन बाटले त्याना उडवल्यान आणि डोळ्यांत पाणी काढुन तिरमिरत तो स्वप्न्याक म्हणलो, ” शाप खाटी आसलेली दो लिटर दी माका…
काय खरा नाय हा…सगळा गोडसान नकोच. .वायच खाटवान होयाच ….
नायतर ह्यो अक्करमाशी दत्तो जगाचो नाय….!”

स्वप्न्यान रतन्याकडे बघित, “देऊ ह्यांका…?
मराबिराची भाषा करतं हत..स्वतःकच गाळी देतं हत.!”
असा इचारल्यान.
रतन्याक दत्त्याचा एकूण प्रकरण म्हायती होताच.
“तशी काळजिची काय गरज नाय ..दी त्याका…”, असा रतन्यान सांगल्यार स्वप्न्यान दत्त्याक दोन लीटर गॅसची माडी दिल्यान.

माडी छपरात एकप्रकारे उदासी इलेली.
दत्त्याच्या काळजातला दुःख अगदी धुरासारख्या प्रत्येकाच्या नाकातोंडात जावन डोळे लाल करुन गेलेला.
एखाद्याचा भाबडा स्वप्न,त्याचो जिवनभराचो जगण्याचो उद्देशच त्याच्यातना काढून घेतलो तर तो जीव काय आणि कसो जगतलो ह्योच एक इचार दत्त्याक बघून थयल्या सगळ्यांच्या मनात तगमगा होतो.

इतक्यात थयसर चक्कीवाल्या परबाचो परगो इलो…
परगो म्हणजे पराग…पराग परब.
तो आता दहा वर्षातरी काॅलेजात शिपाई म्हणान लागलेलो.
डूटी नसली की उन्हाळ्यात दुपारी परगो माडियेक हमखास येईच…अगदी रोज नाय पण तरी दोन दिवसाआड येईच तो.
भुतूर इल्यार परग्यान शाप दात वठ खाईत स्वप्न्याक सांगल्यान, ” चल…चल….चल…चल….पटाक् कन् दोन बाटले भर…
गोड गोड…थंडा थंडा…
झापकन् फिरवतलंय.
जावचा आसा. …!”

इठून परग्याक इचारल्यान, ” खय रे आक्करमाश्या.घाईत खय जातं हं…?
तुका काय प्रोफेसर बनवचो कार्यक्रम ठेवल्यानी हा काय?
बस वायच निंबराचो. ….
थरथरान खयतरी आडयो जाशी नायतर ..!”

आता सगळेच हसाक लागले तसो परगोपण हसान म्हणलो,” अरे काय खय ता इचारु नको.
आज माझी डुटी नाय..
तरी त्या धावके प्रोफेसरांनी फोन करुन माका बोलवुन घेतल्यानी.
पुढच्या आठवड्यात शाळेत पुण्याचे कोनतरी आमच्या गावची सांस्कृतिक परंपरा वगैरे बघुक येवचे हत.
धावके सरांनी धा पंधरा इद्यार्थी इद्यार्थिनी जमवले हत…
पण त्यांका आता कोळीण नाच,शिगम्यातले नायतर दशावताराचे भूमिका कोन शिकवतलो?
पोरग्यांनी मोबायलातना शिकान बघल्यानी पण धावके सरांका ता पसंद नाय …
विद्यार्थ्यांका शिकवुक त्यांका कोणतरी अस्सल स्थानिकच कलाकार नायतर दिग्ददर्शक होयोहा. ….
नंतर पुढच्या महिन्यात आठ दिवस पुण्याच्या इद्यापीठातय ते कार्यक्रमाक नेवचे हत सगळ्यांका. ..
थयव तो दिग्ददर्शक माणुस लागतलो…!
आता माका सांग इठू,माझ्या मानेर तलवार ठेवन माका माणुस शोधुन आणून देवकच होयो अशी तंबी दिल्यानी हा.
आता बघतंय …वरच्या वाड्यात कोन गावलो तर गावलो…
नायतर सरळ फोन बंद करुन निजान देतलंय….
होयत ता होयत…!

शैल्या,रतन्या मेल्यानू तुम्हीच सांगा रे ….
आजकालच्या जमान्यात कोण रे पोरग्यांका कोळीन,दशावतार काॅलेजात येवन शिकवतलो. .?ते पण हय आठ दिवस आणि पुण्याक आठ दिवस….!”

एक क्षण सगळा माडीछप्पर पूर्ण स्तब्ध झाला.
सगळ्यांका घडलेल्या आणि ऐकलेल्या गजालीचो कमालिचो योगायोग खूप कायतरी सांगान गेलो.

नटेश्वराच्या नाराज,रुसलेल्या, हरलेल्या,दुखावलेल्या एका शिष्याक म्हणजे अर्थातच दत्त्याक त्याच्या कानार इश्वासच बसा नाय झालो.

आता शैल्यान परग्याक खुशीत येईत आणि हात जोडीत सांगल्यान, ” परग्या. ..आपलो दत्तो आसा म रे…?
फुल ट्रेनिंग देतलो पोरग्यांका. ….
गेली पंचवीस वर्षा गावात तोच तर कला आणि अभिनय,नाटक वगैरे संस्कृती जपत इलोहा..
ह्यावर्षिच काय तो गोंधळ झालेलो. .
पण तरिव त्याच्या हिश्श्यातला कलेचा कर्तव्य तो आता मोठ्या प्रमाणार आणि वायच मोठ्या मंचार पार पाडूच शकता रे…
भले तो झेंडो गांवच्या देवाचो नसलो तरी गावच्या विद्येच्या कळसाचो म्हणजे काॅलेजचो झेंडो घेवन त्याका काम करुचा लागात….
इतकोच काय तो फरक…!”

परग्याकपण त्याका वणवण न करता धावकेसरांचा काम झाल्याचा सुख होताच….आणि दत्त्याच्या डोळ्यांतना त्याच्या नटेश्वराच्या मूर्तेक अश्रूंचे आनंदमाळा अर्पण होई होते.
पराग्यान ताबडतोब धावकेसरांका फोन लावन दत्त्याशी त्यांचा बोलना करुन दोन दिवसानंतरचे तालमेचे आणि इतर तयारीचे तारखे ठरवले.
परग्यान दत्त्याक “थॅन्क्यू ” म्हणल्यान तसो दत्तो भुतुरसुन आणखी हललो….पण सुखावुन हललो.

नंतर मागवलेली दोन लिटर गॅसची माडी न पिताच पैशे मात्र सगळेच देवन दत्तो माडीछपराबाहेर इलो.
सायकल काढून तो आग्रार जावच्या कच्च्या रस्त्याकडे वळलो.
दोनचार झाळकटी पार झाल्यार त्याना सायकल थांबवून तिचो स्टॅन्ड लावल्यान.
दत्त्यान खिशातना एक छोटी औषधाच्या बाटलेसारी बाटली काढली आणि वायच सुको धोंडो बघून तो तेच्यार बसून रडाक लागलो.

बाटले आंब्यांच्या फवारणेचा खूप जालिम औषध होता.
खरातर दत्तो आज त्याच्या जीवनाचो अंत करुच्याच हिशोबानं घरातना बाहेर पडलेलो.
आदल्या रात्री फवारणीच्या कामारचा थायोडाॅन औषध बाग मालकाच्या नकळत एका खोकल्याच्या औषधाच्या बाटलेत त्याना भरुन घेतलेला.
शुद्ध हरपासर माडी पिवून नंतर हय झाळकटीत येवन ह्या औषध पिऊन जीवन संपवची त्याची योजना होती.
त्याच्या जीवनात एक शिगम्याचे दिवस हेच काय ते कला श्वासाचे होते आणि ह्यार्षीपासना तो श्वासच संपलो तर जगात काय अर्थ असो त्याचो इचार होतो.

दत्त्यान थय खाजनात आता काठियेन एक फूटभर खड्डो खणून ता थायोडाॅन वतून रिक्यामी बाटली खिशात ठेवल्यान.
वर खाजनातली वाळू भरुन तो परत धोंड्यार येवन बसलो.

पण आता नटेश्वराच्या अदृश्य मूर्तीचे पाय पकडून तो माफी मागी होतो…,” चुकलंय रे देवा….क्षमा कर.आत्महत्येचा मोठा पाप ..आणि तापण तुझ्या माथी मारुन करुचो गुन्हो मी करी होतंय.
त्या परग्याच्या रुपानं तू धावलं…माका उचललं. .माका सावारलं. .
ह्यापुढे माझ्याकडे कोण शिकाक नाय इलो तरी मी शिकणारे पोर,पोरी शोधून काढीन आणि त्यांका तथाशक्ती तुझी ओळख घालून देईन….
आणि त्यासाठी फक्त शिगम्याची वाट बघित वर्षभर नाय झुराचंय….!
माफ कर रे….
ह्या निराशेक आजपर्यंत मी थारो दिलंय म्हणान माफ कर…
आजतर तू दिलेला सगळाच इसारलेलंय रे…
पण तूच सावारलं….
एका वेगळ्या पात्रात पुन्हा भरभरुन दिलं ..!
तुझ्या प्रभूपदास. …
कायम आनंदानं नमीत रवतलो ..
तुझोच. ..मी कलानंदी दास…!”

.

Suyog_Pandit

©Suyog Pandit.

(टीप: कथेतील सर्व पात्रे,नांवं,स्थळं व प्रसंग काल्पनिक आहेत.
आणि कथेमध्ये येणारे अपशब्द हे शिव्या वाटल्या तर तो गैरसमज असेल…त्या “गाळ्या” आहेत.
“अस्सल गोड मालवणी गळ्यातून येणार्या सहज भावना म्हणजे गाळ्या. .!”
कोणालाही दुखावायचा तथा असंस्कृतपणाचा इथे संबंध व प्रयत्न नाही…!)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिमगो…कोणाचोही घडू शकता.

माडीछपरी_फुल्ल_अधिकारी (काल्पनिक)

चौथो_भाग (एपिसोड: 4)

शिगम्याच्या सणाचे दिवस इले की माडी छपरातली वर्दळ वाढली म्हणान समजायची.
दिसभर निसता रणरणता निंबार म्हणजे ऊन..!
मध्येच कधी वारो ताठ आसलो तरी त्याका थंडावो म्हणान बिलकुल नाय…निसते गर्म्याचे वळवाटे नायतर गरम झळे..!

बंड्याशेठचा माडीछप्पर वायच मुख्य गावाबाहेर जरी आसला तरी ता दुसर्या अनेक गावांका जोडणार्या रस्त्यावरचा .
रोजच्या गिर्‍हाईक मानसांएवढोच अनोळखी मानसांचो वावर थय नेहमीचोच.
पण गाडिये नायतर मोटारसायकली थांबवून माडीयेचो आस्वाद घेवक थांबलेले कोणी थय फारशे सहज बसा शका नव्हते.
एकतर रोजच्या गिर्हाईकांची बडबड,गडबड आणि गर्दी आणि थेतूर अरुंदशा फळीयेंवर स्वतःक बाटले आणि ग्लासासकट सावरत बसणा ह्या सोप्या नसायचा.
रोजच्या मानसांका मात्र थयले कोने,सांधे सगळे यव्वस्थीत म्हायती होते त्यामुळे त्यांका बसताना तसो फारसो त्रास होई नाय होतो.
थय भुतूर छपरात सर्कस करुच्यापेक्षा ,पर्यटक वगैरे मंडळी सरळ तेंच्या तेंच्या गाडियेत बसून नायतर प्लास्टिकच्या बाटलेंची पार्सला घेऊन जाणा पसंद करीत.

अशेच एका तापलेल्या दुपारी रतनो,इठू,शैलो, आणि रोजच्यापैकीचे रमण,रवगो,संतो,गुरु,दत्तो वगैरे सातआठ जणा आपापली जागा पकडून माडी टाकुचो त्यांचो कार्यभार चालू करून बसलेले .
शिगम्याचे दिवस होते म्हणान संध्याकाळचेपण काही 'माडीपटू' सकाळपासनाच गळे वले करुन तयार आसायचेच.
पण तरी शिगम्याच्या नायतर होळीयेचा असा काय सनसनाटी घडा नाय होता.

स्वप्नो ह्या सगळ्यांका त्यांचो त्यांचो ब्रॅन्ड देवन स्वतः मोबाईलवाशी झालेलो .
कोणाक मोबायलात घुसान बसलेलो बघल्यानी काय इठू आणि रमणचा टाळक्या शाप सटका होता पन आवशी बापाशीविना असणार्या पोरक्या स्वप्न्याक काय बोलून सडसडावचो तेंचो धीर होत नाय कधिच.

"मन रमवुक बाबडो मोबायलात आसता", असा हळूच ते रोज एकमेकांक सांगित पण तरिव खयतरी त्यांचा मोबायलाक बघल्यार खदखदत रवाच होता.

आता वायच एक बाटली दत्त्याच्या पोटात रिचली तशी त्याची जीभ सैल पडाक सुरवात झाली.
सगळ्यांकडे बघित दत्तो म्हणलो, " होळीयेची कायएक मजा उरली नाय आता.
कोळीन,शबय हे फक्त शिगम्याचे दाखवचे सोपस्कार रवले हत.
अरे…वर्गणी पण देतंत ती आवझवारी फोनातना फोनात ..!
आजकालचे पोरय तसलेच..
एकेकाक दाढी काढूक लावुक पाचशे रुपये देवक होये.
जो उठता तो 'कोहली' बनान फिरता मग 'कोळीन' बनवुक दाढी भादरुची पाचश्याची फोडणी फुकटची..!
बरा ह्यांचो भर होळीयेक उपयोग शून्य. .
हेंच्यान कोनच्या परड्यातला माडाचो एक सुको तुटको पिडो नाय उचलुक जमाचो. …कित्या तर कोनी बगल्यान तर फोटो काढतलो आनि फेसबुकार टाकतलो. .
हाड….हेंच्यान काय एक होवचा नाय आणि आता आमच्यात तितक्या कायतरी करुचा शारिरीक घोपान नाय…!"

सगळ्यांका दत्त्याचा म्हणणा पटलेला पण त्या म्हणण्यामागचो त्याचो एक दुःखी सूरपण सगळ्यांका म्हायत होतो.
दत्तो हो पूर्वी वाड्यातल्या मंडळातल्या नाटकात कामा करी.
एक कलाकार म्हणून पुढे त्याका दशावतारात जावचा होता.
बाबी कळिंगन नायतर पार्सेकराच्या धयकाल्यात जावन काम शिकान त्यांच्या मंडळात रवाची तेची इच्छा होती.
पण दत्त्याच्या आवशीक आणि बापाशिक ता मान्य नव्हता.
आवशिन त्याका शप्पथ घातल्यान आणि दत्तानं धयकाल्याचा आणि अभिनयाचा स्वप्नंच नाईलाजान सोडून दिल्यान.
मग दरवर्षी तो शिगम्यात कोळणीचा सोंग घेवन 'शबय' घालुक लागलो.
शिगमो इलो की दत्त्याचा पिवचा प्रमाणय वाढत जाई.
दिसभर निसतो गांवभर कोळीण बनान त्वेषानं नाचून झाला काय संध्याकाळी मिळात ती दारु ढोसून ढोसून आवशी बापाशिच्या नावान मनोमन तो शिगमो घाली.
तो आवशी बापाशीक त्यांच्या हयातित पण कधी गाळी घालून बोललो नव्हतो पण त्याची तगमग,तडफड शिगम्याच्या मोसमात बाहेर येई…
शिगम्यात पिल्यान तरिव तो त्यांका त्वांड उघडून कधीच गाळी घाली नायच..
तो स्वतःकच मोठमोठ्यान गाळी घालित घराकडे जाई. .आणि रातभर नाटकात काम केलेले जुने फोटो बघित रडान रडान झोपान देई.
झिलाचा मन दुकावल्याचो आवशीक खूप नंतर पश्चाताप झालो खरो पण तवसर दत्त्याची पन्नाशी इलेली. ..दत्त्याच्या चाळीशीत बापुस गेलो पण जातानाय त्याका नाटक,धयकाल्यापासून लांब रव असा बजावीतच तो गेलो….
बापाशीक दत्त्याक धयकाल्यात न धाडल्याबद्दल कायम अभिमान होतो….एक अहंकारी अभिमान.

पुढे वयापरत्वे दत्त्यान कोळणिचा सोंगय घेवचा बंद केल्यान पण मेल्यान मनोमन अभिनयाशिच जुळवून घेतला आसल्याकारणान तो सोंगा तयार करुक आणि त्यांच्या तालमेक मदत करी.

पण ह्यावर्षी कायतरी नविनच प्रकार घडा होतो आणि तेचा दुःख दत्त्याच्या काळजात जास्ती होता.
आता नविन पोरगे मोबाईलाचो उपयोग करुन अभिनय शिका होते.
कपडे,मुकुट,दागिने,रंग वगैरे सगळे वस्तूपण मोबाईलातनाच येई होते.
वर्षातना आठ दिवस तरी दत्त्यातल्या अभिनय कलेक आणि नटराजाच्या अस्तित्वाक गांवभर मान आणि मागणी होती.
तालमिचे,कलेचे पैशे ,बिदागी तो कधिच घेई नाय होतो कारण त्याचा मजुरीचा गवंडीकाम आणि आंब्यारच्या फवारणेचा काम मिळान रोजचे हजार बाराशे रुपये तरी त्याका देई होता..!

दत्त्यान लगिन करुक नव्हता कारण त्याचा मन आधिच खच्चीकरण होवन कोमेजलेला फूल होता आणि तेच्यार आणखी कसली जबाबदारी पेलुची त्याच्यातली मानसिक ताकद तशी तरुण वयातच संपलेली ..
पुतणो,भाचो ह्यांच्यावांगडा तो कुटुंब नायतर लेकरांचा सुख घेई होतोच पण आता जो तो कसल्यातरी व्यापात ..!

तो शिगम्यातलो आठ दिवसाचो "रंगदेवतेचो आणि नटेश्वराचो" अगदी मनोभावे सेवेकरी होतो.
पण त्याच्या आत्म्याच्या श्वासाच्या शिगम्याच्या सणाक गेली दोनतीन वर्षा वायच झळ बसलेली आणि ह्यावर्षी तर त्याका शिगम्याचा असा कायच काम नव्हता. …
ही खरी सुई दत्त्याच्या काळजाक टोचा होती…!

गेली दोनतीन वर्षा त्याना देशी,इंग्लिश दारु बंद करुन माडियेकडे मोर्चो वळवलेल्यान.
ह्या वर्षिचे हे शिगम्याचे आठ दिवस त्याका अक्षरशः नरकयातना देई होते.
आत्ताय बोलता बोलता जवळपास तीन बाटले त्याना उडवल्यान आणि डोळ्यांत पाणी काढुन तिरमिरत तो स्वप्न्याक म्हणलो, " शाप खाटी आसलेली दो लिटर दी माका…
काय खरा नाय हा…सगळा गोडसान नकोच. .वायच खाटवान होयाच ….
नायतर ह्यो अक्करमाशी दत्तो जगाचो नाय….!"

स्वप्न्यान रतन्याकडे बघित, "देऊ ह्यांका…?
मराबिराची भाषा करतं हत..स्वतःकच गाळी देतं हत.!"
असा इचारल्यान.
रतन्याक दत्त्याचा एकूण प्रकरण म्हायती होताच.
"तशी काळजिची काय गरज नाय ..दी त्याका…", असा रतन्यान सांगल्यार स्वप्न्यान दत्त्याक दोन लीटर गॅसची माडी दिल्यान.

माडी छपरात एकप्रकारे उदासी इलेली.
दत्त्याच्या काळजातला दुःख अगदी धुरासारख्या प्रत्येकाच्या नाकातोंडात जावन डोळे लाल करुन गेलेला.
एखाद्याचा भाबडा स्वप्न,त्याचो जिवनभराचो जगण्याचो उद्देशच त्याच्यातना काढून घेतलो तर तो जीव काय आणि कसो जगतलो ह्योच एक इचार दत्त्याक बघून थयल्या सगळ्यांच्या मनात तगमगा होतो.

इतक्यात थयसर चक्कीवाल्या परबाचो परगो इलो…
परगो म्हणजे पराग…पराग परब.
तो आता दहा वर्षातरी काॅलेजात शिपाई म्हणान लागलेलो.
डूटी नसली की उन्हाळ्यात दुपारी परगो माडियेक हमखास येईच…अगदी रोज नाय पण तरी दोन दिवसाआड येईच तो.
भुतूर इल्यार परग्यान शाप दात वठ खाईत स्वप्न्याक सांगल्यान, " चल…चल….चल…चल….पटाक् कन् दोन बाटले भर…
गोड गोड…थंडा थंडा…
झापकन् फिरवतलंय.
जावचा आसा. …!"

इठून परग्याक इचारल्यान, " खय रे आक्करमाश्या.घाईत खय जातं हं…?
तुका काय प्रोफेसर बनवचो कार्यक्रम ठेवल्यानी हा काय?
बस वायच निंबराचो. ….
थरथरान खयतरी आडयो जाशी नायतर ..!"

आता सगळेच हसाक लागले तसो परगोपण हसान म्हणलो," अरे काय खय ता इचारु नको.
आज माझी डुटी नाय..
तरी त्या धावके प्रोफेसरांनी फोन करुन माका बोलवुन घेतल्यानी.
पुढच्या आठवड्यात शाळेत पुण्याचे कोनतरी आमच्या गावची सांस्कृतिक परंपरा वगैरे बघुक येवचे हत.
धावके सरांनी धा पंधरा इद्यार्थी इद्यार्थिनी जमवले हत…
पण त्यांका आता कोळीण नाच,शिगम्यातले नायतर दशावताराचे भूमिका कोन शिकवतलो?
पोरग्यांनी मोबायलातना शिकान बघल्यानी पण धावके सरांका ता पसंद नाय …
विद्यार्थ्यांका शिकवुक त्यांका कोणतरी अस्सल स्थानिकच कलाकार नायतर दिग्ददर्शक होयोहा. ….
नंतर पुढच्या महिन्यात आठ दिवस पुण्याच्या इद्यापीठातय ते कार्यक्रमाक नेवचे हत सगळ्यांका. ..
थयव तो दिग्ददर्शक माणुस लागतलो…!
आता माका सांग इठू,माझ्या मानेर तलवार ठेवन माका माणुस शोधुन आणून देवकच होयो अशी तंबी दिल्यानी हा.
आता बघतंय …वरच्या वाड्यात कोन गावलो तर गावलो…
नायतर सरळ फोन बंद करुन निजान देतलंय….
होयत ता होयत…!

शैल्या,रतन्या मेल्यानू तुम्हीच सांगा रे ….
आजकालच्या जमान्यात कोण रे पोरग्यांका कोळीन,दशावतार काॅलेजात येवन शिकवतलो. .?ते पण हय आठ दिवस आणि पुण्याक आठ दिवस….!"

एक क्षण सगळा माडीछप्पर पूर्ण स्तब्ध झाला.
सगळ्यांका घडलेल्या आणि ऐकलेल्या गजालीचो कमालिचो योगायोग खूप कायतरी सांगान गेलो.

नटेश्वराच्या नाराज,रुसलेल्या, हरलेल्या,दुखावलेल्या एका शिष्याक म्हणजे अर्थातच दत्त्याक त्याच्या कानार इश्वासच बसा नाय झालो.

आता शैल्यान परग्याक खुशीत येईत आणि हात जोडीत सांगल्यान, " परग्या. ..आपलो दत्तो आसा म रे…?
फुल ट्रेनिंग देतलो पोरग्यांका. ….
गेली पंचवीस वर्षा गावात तोच तर कला आणि अभिनय,नाटक वगैरे संस्कृती जपत इलोहा..
ह्यावर्षिच काय तो गोंधळ झालेलो. .
पण तरिव त्याच्या हिश्श्यातला कलेचा कर्तव्य तो आता मोठ्या प्रमाणार आणि वायच मोठ्या मंचार पार पाडूच शकता रे…
भले तो झेंडो गांवच्या देवाचो नसलो तरी गावच्या विद्येच्या कळसाचो म्हणजे काॅलेजचो झेंडो घेवन त्याका काम करुचा लागात….
इतकोच काय तो फरक…!"

परग्याकपण त्याका वणवण न करता धावकेसरांचा काम झाल्याचा सुख होताच….आणि दत्त्याच्या डोळ्यांतना त्याच्या नटेश्वराच्या मूर्तेक अश्रूंचे आनंदमाळा अर्पण होई होते.
पराग्यान ताबडतोब धावकेसरांका फोन लावन दत्त्याशी त्यांचा बोलना करुन दोन दिवसानंतरचे तालमेचे आणि इतर तयारीचे तारखे ठरवले.
परग्यान दत्त्याक "थॅन्क्यू " म्हणल्यान तसो दत्तो भुतुरसुन आणखी हललो….पण सुखावुन हललो.

नंतर मागवलेली दोन लिटर गॅसची माडी न पिताच पैशे मात्र सगळेच देवन दत्तो माडीछपराबाहेर इलो.
सायकल काढून तो आग्रार जावच्या कच्च्या रस्त्याकडे वळलो.
दोनचार झाळकटी पार झाल्यार त्याना सायकल थांबवून तिचो स्टॅन्ड लावल्यान.
दत्त्यान खिशातना एक छोटी औषधाच्या बाटलेसारी बाटली काढली आणि वायच सुको धोंडो बघून तो तेच्यार बसून रडाक लागलो.

बाटले आंब्यांच्या फवारणेचा खूप जालिम औषध होता.
खरातर दत्तो आज त्याच्या जीवनाचो अंत करुच्याच हिशोबानं घरातना बाहेर पडलेलो.
आदल्या रात्री फवारणीच्या कामारचा थायोडाॅन औषध बाग मालकाच्या नकळत एका खोकल्याच्या औषधाच्या बाटलेत त्याना भरुन घेतलेला.
शुद्ध हरपासर माडी पिवून नंतर हय झाळकटीत येवन ह्या औषध पिऊन जीवन संपवची त्याची योजना होती.
त्याच्या जीवनात एक शिगम्याचे दिवस हेच काय ते कला श्वासाचे होते आणि ह्यार्षीपासना तो श्वासच संपलो तर जगात काय अर्थ असो त्याचो इचार होतो.

दत्त्यान थय खाजनात आता काठियेन एक फूटभर खड्डो खणून ता थायोडाॅन वतून रिक्यामी बाटली खिशात ठेवल्यान.
वर खाजनातली वाळू भरुन तो परत धोंड्यार येवन बसलो.

पण आता नटेश्वराच्या अदृश्य मूर्तीचे पाय पकडून तो माफी मागी होतो…," चुकलंय रे देवा….क्षमा कर.आत्महत्येचा मोठा पाप ..आणि तापण तुझ्या माथी मारुन करुचो गुन्हो मी करी होतंय.
त्या परग्याच्या रुपानं तू धावलं…माका उचललं. .माका सावारलं. .
ह्यापुढे माझ्याकडे कोण शिकाक नाय इलो तरी मी शिकणारे पोर,पोरी शोधून काढीन आणि त्यांका तथाशक्ती तुझी ओळख घालून देईन….
आणि त्यासाठी फक्त शिगम्याची वाट बघित वर्षभर नाय झुराचंय….!
माफ कर रे….
ह्या निराशेक आजपर्यंत मी थारो दिलंय म्हणान माफ कर…
आजतर तू दिलेला सगळाच इसारलेलंय रे…
पण तूच सावारलं….
एका वेगळ्या पात्रात पुन्हा भरभरुन दिलं ..!
तुझ्या प्रभूपदास. …
कायम आनंदानं नमीत रवतलो ..
तुझोच. ..मी कलानंदी दास…!"

.

Suyog_Pandit

©Suyog Pandit.

(टीप: कथेतील सर्व पात्रे,नांवं,स्थळं व प्रसंग काल्पनिक आहेत.
आणि कथेमध्ये येणारे अपशब्द हे शिव्या वाटल्या तर तो गैरसमज असेल…त्या "गाळ्या" आहेत.
"अस्सल गोड मालवणी गळ्यातून येणार्या सहज भावना म्हणजे गाळ्या. .!"
कोणालाही दुखावायचा तथा असंस्कृतपणाचा इथे संबंध व प्रयत्न नाही…!)

error: Content is protected !!