26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

२५ वर्षीय तरुणांची गळफास लावून आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | वैभव माणगांवकर : शहरातील गवंडीवाडा भागात राहणारा शुभम अरुण शिंदे या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बंद घराच्या ओसरीच्या वाश्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. याबाबत मालवण पोलिसात शुभम याचे वडील अरुण शिंदे यांनी खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण शहरातील गवंडीवाडा भागात राहणारा शुभम अरुण शिंदे हा आपली पत्नी दोन मुले आई वडीलांसमवेत राहत होता तो मच्छिमारी करायचा. काल रात्रौ ८:३० वाजता शुभम हा घरी परतल्यानंतर काहीवेळ वडिलांशी त्याने संवाद साधला त्यानंतर घरातील मंडळी झोपी गेली. आज सकाळी शुभम याची आई ही कामानिमित्त घराबाहेर आल्यानंतर तिला शेजारच्या बंद घराच्या ओसरीला शुभम याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

याबाबत अरुण विठ्ठल शिंदे यांनी मालवण पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ. हेमंत पेडणेकर हे अधिक तपास करत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | वैभव माणगांवकर : शहरातील गवंडीवाडा भागात राहणारा शुभम अरुण शिंदे या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बंद घराच्या ओसरीच्या वाश्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. याबाबत मालवण पोलिसात शुभम याचे वडील अरुण शिंदे यांनी खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण शहरातील गवंडीवाडा भागात राहणारा शुभम अरुण शिंदे हा आपली पत्नी दोन मुले आई वडीलांसमवेत राहत होता तो मच्छिमारी करायचा. काल रात्रौ ८:३० वाजता शुभम हा घरी परतल्यानंतर काहीवेळ वडिलांशी त्याने संवाद साधला त्यानंतर घरातील मंडळी झोपी गेली. आज सकाळी शुभम याची आई ही कामानिमित्त घराबाहेर आल्यानंतर तिला शेजारच्या बंद घराच्या ओसरीला शुभम याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

याबाबत अरुण विठ्ठल शिंदे यांनी मालवण पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ. हेमंत पेडणेकर हे अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!