शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील शिरगांव येथील शिरगांव पंचक्रोशी ( तालुका देवगड ) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संस्थापक अध्यक्ष कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांचा जयंती कार्यक्रम शुक्रवार दिनांक १५ जुलैला सकाळी ११ वाजता शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मार्च/एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी./ १२ वी. शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या जयंती कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य शमशुधीन अत्तार यांनी केले आहे.