शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ देवगड आणि महाराष्ट्र तैलिक महासभा यांच्या संयुक्त प्रयत्नातून इ. १० वी/१२ वी , पदवीधर विद्यार्थी व पालक यांच्यासाठी करिअर मंत्रा २०२२ हा करिअर विषयी संवाद व गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक १७ जुलैला सकाळी १० वाजता तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी येथील बळीराम पारकर विद्यालय व मयेकर ज्युनिअर कॉलेज चे माजी मुख्याध्यापक तसेच श्री देव गणपतीपुळे संस्थानचे सेक्रेटरी विनायक राऊत,जामसंडे देवगड नगर पंचायतीच्या नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी युनिक अकॅडमी कणकवली शाखेचे व्यवस्थापक सचिन कोर्लेकर हे “शासकीय सेवा व त्यांची तयारी” या विषयावर तर पुणे येथील द करिअर कनेक्शन चे नितीन बांदेकर हे “आपले करिअर आपल्या हातात, खाजगी क्षेत्र” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोक तेली,सचिव विजय शेट्ये,खजिनदार नारायण हिंदळेकर यांनी केले आहे.