मालवण | विनीत मंडलिक : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात भाजपातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवणातील निवासस्थान असलेल्या नीलरत्न बंगल्यामध्ये बारावी परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. संध्याकाळी ५.०० वाजता हा गौरव सत्कार सोहळा संपन्न होईल.

माजी खासदार आणि युवानेते डाॅ.निलेश राणे यांनी यशस्वी मुलामुलींना बक्षिस म्हणून टॅब देण्याची घोषणा केली होती त्याची वचनपूर्ती करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजीत करण्यात आला असल्याचे समजते.
भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी डाॅ निलेश राणे म्हणजे ‘दिलेले वचन जातीने पूर्ण करणारे नेते’ असल्याचे सांगितले आहे.

या सोहळ्याला मालवण शहरातील सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख,लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती भाजपा शहर प्रभारी श्री.विजय केनवडेकर आणि भाजयुमो शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केली आहे.
