29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भूमी ध्यासाचे द्विशतक..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | संपादकीय : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या लाॅकडाऊनपूर्वी एक वर्ष ‘गराजलो रे गराजलो’ ही नाट्य चळवळ सामाजिक डिजीटल मंचावरुन लोकांपर्यंत पोहोचली.
श्री सोमेश्वर कलामंच निर्मित ही चळवळ म्हणजे भूमी आणि रंगभूमी या दोन घटकांची सांगड काहीतरी सांगू पहात होती. श्री सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष व गराजलो रे गराजलो नाट्य च॓ळवळीचे प्रणेते सहदेव धर्णे हे नांव मुंबईस्थीत कोकणवासियांना परिचयाचे होते. डिजीटल मंचामुळे ते नांव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकणातील बहुसंख्य घरामध्ये पोहोचू लागले.

गराजलो रे गराजलोच्या माध्यमातून कोकणातील कार्यरत व्यक्ती,संस्थांचे सदस्य आणि कोकणाशी निगडीत व्यावसायिक यांच्या मुलाखतींना सुरवात झाली.
त्याच दरम्यान दर शुक्रवारी अध्यक्ष सहदेव धर्णे लाईव्ह येऊन कोकणातील भूमीपुत्रांशी संवाद साधू लागले. नाट्य चळवळीच्या माध्यमातून कलाचैतन्य निर्मिती करताना त्यातून येणार्या निधीचा सहभागी कलाकार संच व कोकणातील सामाजिक कार्याला हातभार असे दोन हेतू साध्य करणे हेच गराजलो रे गराजलो संकल्पनेचे ध्येय होते आणि आहे.

परंतु ते ध्येय आणखीन एक पाऊल पुढे टाकून एक वेगळाच आग्रहाचा व कळकळीचा जो संदेश देतं तो आहे कोकणवासीय किंवा कुठल्याच क्षेत्रातील भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी विकू नयेत.
अध्यक्ष सहदेव धर्णे यांनी नाट्यचळवळीच्या मुलाखत विभागासाठी स्वतःसोबत प्रथमेश परब,बिंदीया मोहीते आणि इतर युवा चेहरेदेखील समाजासमोर आणले.

हा सगळा शब्दांत मावणारा प्रवास नव्हता.
संकल्पना आखणे व राबवणे यातील दरी सहदेव धर्णे यांना कळत जाऊ लागली. मग त्यांनी मुंबईतील पोटाचा प्रपंच सांभाळून कोकणच्या धावत्या भेटी घ्यायला प्रारंभ केला. वेंगुर्ले तालुक्यातील अशोक परब नावाच्या एक कलासक्त व समाजसेवी व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांना झाला. सहदेव धर्णेंना समाजसेवेसाठी अक्षरशः ‘गुणिले दोन’ बळ मिळाल्याचा आनंद झाला.
जवळपास दोन वर्षे अथक उलट सुलट प्रवास,कटू अनुभव, अल्प प्रतिसाद,तोंडी आश्वासने, शंकीत चेहरे आणि बर्याचशा किंतु परंतुवर मात करत गराजलो रे गराजलो नाटकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संचाचा पहिला प्रयोग, पावसाने कहर करुन देखील कुडाळ शहरात दणदणीत नाट्य चळवळ पदार्पण करुन गेला आणि नुकतीच गराजलो रे गराजलोच्या ऑनलाईन मुलाखत चर्चासत्रांनी द्विशतक देखील पूर्ण केले.

नियमितपणे आणि सलगपणे डिजीटल मंचावरुन सेवाभावी सांघिक पद्धतीने 200 भाग पूर्ण करणारी, कुठल्याच वादात न अडकलेली आणि संपूर्ण पारदर्शी अशी राज्यातील पहिली चळवळ ‘गराजलो रे गराजलो’ आहे यात दुमत नाही.

श्री सोमेश्वर कलामंच,गराजलो रे गराजलो नाटक आणि त्यांचे लाईव्ह चर्चासत्र त्यांचे सामाजिक उद्देश व उपदेश घेऊन सदैव गर्जत राहीलच….आणि तो भूमीच्या वंदनाचा झेंडा प्रत्येक भूमीपुत्राच्या हाती द्यायचे काम सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष व गराजलो रे गराजलोचे प्रणेते श्री.सहदेव धर्णे यांनी तीन वर्षांपूर्वीच सुरु केले आहे.
अगदी बिहार व उत्तर प्रदेशच्याही भूमी पुत्राला मार्गदर्शन करताना सहदेव धर्णे म्हणतात की आपली जमीन विकायचा अधिकार आपल्याला नाही. एकतर ती कसवा,पिकवा नाहीतर त्यावर छोटा उद्योग व्यवसाय करा…पण खरंच विकू नका….
सहदेव धर्णे यांचा कळकळीचा ‘खरंच’ हा शब्द ‘खरंच खरा असतो..!’

सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | संपादकीय : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या लाॅकडाऊनपूर्वी एक वर्ष 'गराजलो रे गराजलो' ही नाट्य चळवळ सामाजिक डिजीटल मंचावरुन लोकांपर्यंत पोहोचली.
श्री सोमेश्वर कलामंच निर्मित ही चळवळ म्हणजे भूमी आणि रंगभूमी या दोन घटकांची सांगड काहीतरी सांगू पहात होती. श्री सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष व गराजलो रे गराजलो नाट्य च॓ळवळीचे प्रणेते सहदेव धर्णे हे नांव मुंबईस्थीत कोकणवासियांना परिचयाचे होते. डिजीटल मंचामुळे ते नांव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकणातील बहुसंख्य घरामध्ये पोहोचू लागले.

गराजलो रे गराजलोच्या माध्यमातून कोकणातील कार्यरत व्यक्ती,संस्थांचे सदस्य आणि कोकणाशी निगडीत व्यावसायिक यांच्या मुलाखतींना सुरवात झाली.
त्याच दरम्यान दर शुक्रवारी अध्यक्ष सहदेव धर्णे लाईव्ह येऊन कोकणातील भूमीपुत्रांशी संवाद साधू लागले. नाट्य चळवळीच्या माध्यमातून कलाचैतन्य निर्मिती करताना त्यातून येणार्या निधीचा सहभागी कलाकार संच व कोकणातील सामाजिक कार्याला हातभार असे दोन हेतू साध्य करणे हेच गराजलो रे गराजलो संकल्पनेचे ध्येय होते आणि आहे.

परंतु ते ध्येय आणखीन एक पाऊल पुढे टाकून एक वेगळाच आग्रहाचा व कळकळीचा जो संदेश देतं तो आहे कोकणवासीय किंवा कुठल्याच क्षेत्रातील भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी विकू नयेत.
अध्यक्ष सहदेव धर्णे यांनी नाट्यचळवळीच्या मुलाखत विभागासाठी स्वतःसोबत प्रथमेश परब,बिंदीया मोहीते आणि इतर युवा चेहरेदेखील समाजासमोर आणले.

हा सगळा शब्दांत मावणारा प्रवास नव्हता.
संकल्पना आखणे व राबवणे यातील दरी सहदेव धर्णे यांना कळत जाऊ लागली. मग त्यांनी मुंबईतील पोटाचा प्रपंच सांभाळून कोकणच्या धावत्या भेटी घ्यायला प्रारंभ केला. वेंगुर्ले तालुक्यातील अशोक परब नावाच्या एक कलासक्त व समाजसेवी व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांना झाला. सहदेव धर्णेंना समाजसेवेसाठी अक्षरशः 'गुणिले दोन' बळ मिळाल्याचा आनंद झाला.
जवळपास दोन वर्षे अथक उलट सुलट प्रवास,कटू अनुभव, अल्प प्रतिसाद,तोंडी आश्वासने, शंकीत चेहरे आणि बर्याचशा किंतु परंतुवर मात करत गराजलो रे गराजलो नाटकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संचाचा पहिला प्रयोग, पावसाने कहर करुन देखील कुडाळ शहरात दणदणीत नाट्य चळवळ पदार्पण करुन गेला आणि नुकतीच गराजलो रे गराजलोच्या ऑनलाईन मुलाखत चर्चासत्रांनी द्विशतक देखील पूर्ण केले.

नियमितपणे आणि सलगपणे डिजीटल मंचावरुन सेवाभावी सांघिक पद्धतीने 200 भाग पूर्ण करणारी, कुठल्याच वादात न अडकलेली आणि संपूर्ण पारदर्शी अशी राज्यातील पहिली चळवळ 'गराजलो रे गराजलो' आहे यात दुमत नाही.

श्री सोमेश्वर कलामंच,गराजलो रे गराजलो नाटक आणि त्यांचे लाईव्ह चर्चासत्र त्यांचे सामाजिक उद्देश व उपदेश घेऊन सदैव गर्जत राहीलच….आणि तो भूमीच्या वंदनाचा झेंडा प्रत्येक भूमीपुत्राच्या हाती द्यायचे काम सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष व गराजलो रे गराजलोचे प्रणेते श्री.सहदेव धर्णे यांनी तीन वर्षांपूर्वीच सुरु केले आहे.
अगदी बिहार व उत्तर प्रदेशच्याही भूमी पुत्राला मार्गदर्शन करताना सहदेव धर्णे म्हणतात की आपली जमीन विकायचा अधिकार आपल्याला नाही. एकतर ती कसवा,पिकवा नाहीतर त्यावर छोटा उद्योग व्यवसाय करा…पण खरंच विकू नका….
सहदेव धर्णे यांचा कळकळीचा 'खरंच' हा शब्द 'खरंच खरा असतो..!'

सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

error: Content is protected !!