28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

विद्यार्थी रमले बांधावरच्या शाळेतील भातशेतीत.!(विशेषवृत्त)

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे |प्राजक्ता पेडणेकर (विशेषवृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम नुकताच भातशेती मध्ये लावणी करत राबविण्यात आला.
जि.प.सिंधुदुर्गचा बांधावरील शाळा हा उपक्रम मागिल दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होता.कोरानाचा वेग मंदावला आणि शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकाचे धडे घेता – घेता शेतीचेही धडे घेणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने जि.प.शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेतला.
भारत हा देश शेती प्रधान आहे.देशातील ९०% लोक शेतीवर आपली उपजिविका करतात.सहाजिकच बालवयात शेतीविषयी ची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे आजचे विद्यार्थी शेतीचे धडे गिरवून आधुनिक शेतीकडे वळतील असा विश्वास शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दिप्ती परब यांनी व्यक्त केला.यावेळी विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री.आनंद तांबे सहकारी शिक्षिका रूपाली हुंन्नरे तसेच पालक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे |प्राजक्ता पेडणेकर (विशेषवृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम नुकताच भातशेती मध्ये लावणी करत राबविण्यात आला.
जि.प.सिंधुदुर्गचा बांधावरील शाळा हा उपक्रम मागिल दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होता.कोरानाचा वेग मंदावला आणि शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकाचे धडे घेता - घेता शेतीचेही धडे घेणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने जि.प.शाळा ओटव नांदगाव व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा,सर्व सदस्य यांच्या समवेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेतला.
भारत हा देश शेती प्रधान आहे.देशातील ९०% लोक शेतीवर आपली उपजिविका करतात.सहाजिकच बालवयात शेतीविषयी ची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे आजचे विद्यार्थी शेतीचे धडे गिरवून आधुनिक शेतीकडे वळतील असा विश्वास शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दिप्ती परब यांनी व्यक्त केला.यावेळी विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री.आनंद तांबे सहकारी शिक्षिका रूपाली हुंन्नरे तसेच पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!