26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

धामापूर पेठवाडीत सोनेरी कोल्ह्याला वनविभागाकडून जीवदान…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मालवण तालुक्यातील मौजे धामापूर पेठवाडीतील दिनेश काळसेकर यांच्या विहीरी मध्ये पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाने सुखरूप विहिरी बाहेर काढत जीवदान दिले आहे. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास ग्रामस्थ सुशीलकुमार घाडी यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच वनविभागाला कळविले. वनपरिक्षेत्र कुडाळ चे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत 15 ते 20 फूट खोल विहिरीतून त्यास सुखरूप बाहेर काढले.

भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या या विहिरीत वन्यप्राणी कोल्हा आत मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री . अमृत शिंदे यांनी सांगितले.
पाण्याची पातळी सुमारे 4 ते 5 फूट असलेल्या या विहिरीत कोल्ह्याने बिळ केल्याने तो पाण्याबाहेर येताच त्या बिळामध्ये जात असलेने अडचण येत होती. अखेर अथक प्रयत्नाने त्यास पिंजऱ्यात घेण्यात बचाव पथकास यश आले.
श्री शिंदे म्हणाले ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने या सोनेरी कोल्ह्याचा जीव वाचवता आला. त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक करण्यात आले .
सदर वन्यप्राणी सोनेरी कोल्ह्या याचे रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक श्री.दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे , वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर श्री शरद कांबळे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ सुशील घाडी, बाळकृष्ण घाडीगावकर, दिनेश काळसेकर, तेजस वालावलकर, चेतन काळसेकर यांच्या मदतीने यशस्वी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मालवण तालुक्यातील मौजे धामापूर पेठवाडीतील दिनेश काळसेकर यांच्या विहीरी मध्ये पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाने सुखरूप विहिरी बाहेर काढत जीवदान दिले आहे. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास ग्रामस्थ सुशीलकुमार घाडी यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच वनविभागाला कळविले. वनपरिक्षेत्र कुडाळ चे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत 15 ते 20 फूट खोल विहिरीतून त्यास सुखरूप बाहेर काढले.

भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या या विहिरीत वन्यप्राणी कोल्हा आत मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री . अमृत शिंदे यांनी सांगितले.
पाण्याची पातळी सुमारे 4 ते 5 फूट असलेल्या या विहिरीत कोल्ह्याने बिळ केल्याने तो पाण्याबाहेर येताच त्या बिळामध्ये जात असलेने अडचण येत होती. अखेर अथक प्रयत्नाने त्यास पिंजऱ्यात घेण्यात बचाव पथकास यश आले.
श्री शिंदे म्हणाले ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने या सोनेरी कोल्ह्याचा जीव वाचवता आला. त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक करण्यात आले .
सदर वन्यप्राणी सोनेरी कोल्ह्या याचे रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक श्री.दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे , वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर श्री शरद कांबळे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ सुशील घाडी, बाळकृष्ण घाडीगावकर, दिनेश काळसेकर, तेजस वालावलकर, चेतन काळसेकर यांच्या मदतीने यशस्वी केले.

error: Content is protected !!