कुडाळ-मालवण तालुका ‘शिवसंपर्क अभियान’ अंतर्गत आयोजन..
कुडाळ । देवेंद्र गावडे
गुरूवार । २६ मे, २०२२
आज गुरुवार दिनांक २६/०५/२०२२ रोजी वालावल पंचायत समिती ( हुमरमळा, कवठी, चेंदवण, वालावल ) यांची सभा चेंदवण येथे संध्या.४.०० वाजता किरण कोचरेकर यांच्या निवासस्थानी होईल.
तर नेरूर पंचायत समिती ( नेरूर, सरंबळ ) यांची सभा सरंबळ-दुर्गवाड येथे सायं. ६.०० वाजता संपन्न होईल.
तरी नेरूर विभागातील सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना नेरूर विभाग प्रमुख यांच्यावतीने करण्यात आले आहे.