शास्त्रीय गायन (हिंदूस्थानी ख्याल) व सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा..!!
श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग व स्वयंभू कला क्रिडा मंडळ, आजगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.!!
आजगांव । देवेंद्र गावडे
गुरूवार । २६ मे, २०२२
स्वयंभू कला क्रिडा मंडळ, आजगांव आणि श्री राधाकृष्ण संगीत साधना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राधाकृष्ण चषक २०२२’चे अंतर्गत शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल) व सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा आजगांव येथे संपन्न होणार आहे.
सदर दोन्ही स्पर्धांचा उद्घाटन समारंभ अनुक्रमे शनिवार दिनांक २८ मे,२०२२ रोजी दूपारी २.३० वा. आणि रविवार दिनांक २९ मे, २०२२ रोजी दूपारी २.३० वा. श्री वेतोबा मंदिर सभागृह, आजगांव येथे संपन्न होणार आहे. असे स्वयंभू कला क्रिडा मंडळ, आजगांवचे अध्यक्ष श्री. रामचंद्र झाट्ये व श्री राधाकृष्ण संगीत साधना, सिंधुदुर्गच्या अध्यक्षा सौ. वीणा दळवी यांनी जाहिर केले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक २८ मे रोजी होणा-या उद्घाटन सोहळ्यासाठी श्रीम. रूचीताई राऊत, श्री. संजयदादा पाटणकर, श्री. एकनाथ नारोजी, सौ. सुप्रिया मेस्त्री याची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तर बक्षिस वितरण सौ. अर्चनाताई घारे-परब, श्री. पुंडलिक दळवी, अॅड. प्रमोद प्रभूआजगांवकर, श्री. वासूदेव उर्फ दादा प्रभूआजगांवकर यांच्या हस्ते होणार आहे.
रविवार, दिनांक २९ मे रोजी सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन श्री. मनीष दळवी, श्री. विनोद पालयेकर, श्री. भास्कर वैद्य, श्री. हेमंत मराठे यांच्या प्रमूख उपस्थितीत होणार असून बक्षिस समारंभ श्री. काका केसरकर, डाॅ. श्रीराम दिक्षित, श्री. चंद्रकांत प्रभूआजगांवकर, डाॅ. विलास गावडे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांच्यावतीने कळविण्यात येत आहे.