25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘अजिंक्यतारा’..नाट्यप्रयोगांचे विक्रमी अर्धशतक..!!

- Advertisement -
- Advertisement -

लोकराजा नटसम्राट श्री. सुधीर कलिंगण संचलित श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांची अनोखी ‘सुवर्ण’ कामगिरी..!!

दशावतार नाट्यकलेतील दिग्गज कलाकारांचा सत्कार सोहळा..!!

कुडाळ । देवेंद्र गावडे
बुधवार । २६ मे, २०२२

विशेष वृत्त :

लोकराजा नटसम्राट श्री. सुधीर कलिंगण संचलित श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाने विक्रमी कामगिरी करत ‘अजिंक्यतारा’ या ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोगाचा विक्रमी ५०वा नाट्यप्रयोग पेंडूर देऊळवाडी येथे, बुधवार २५ मे रोजी रात्रौ नऊ वाजण्याच्या सुमारास सादर करत नाट्यप्रयोगांचे ‘अर्धशतक’ गाठले.

मास्टर दादा राणे कोनसकर व राम राणे कोनसकर लिखित आणि दशावतार नाट्यकलेचे मानबिंदू नटसम्राट लोकराजा श्री. सुधीरजी कलिंगण यांच्या अभिनयाने अजरामर झालेली ही नाट्यकलाकृती सध्या सिंधुदुर्ग, गोवा परिसरात यशस्वीरित्या घोडदौड करत आहे.

या ‘अजिंक्यतारा’ नाटकाच्या ‘सुवर्ण’ कारकिर्दिला अश्रूंच्या ओलाव्याची देखील किनार आहे.

प्रतीवर्षीप्रमाणे श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे मालक श्री. सुधीरजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच मुख्य भुमिकेने नटलेल्या ‘अजिंक्यतारा’ नाट्यप्रयोगांची सुरूवात झाली खरी..पण स्वतःच्या उत्तम कलागुणांच्या..अदाकारीच्या जोरावर दशावतार नाट्यकलेतील अढळपद मिळवलेला हा ‘अजिंक्यतारा’ श्री. सुधीरजी कलिंगण यांनी मात्र अकाली ‘एक्झिट’ घेतली.

दशावतार नाट्यक्षेत्रावर..पर्यायाने कलेश्वर दशावतार नाट्यमंडळावर दुःखाचे आभाळ कोसळले. करोना महामारीच्या भिषणतेतून नुकत्याच सावरू पहाणा-या दशावतार नाट्यक्षेत्राला हा फार मोठा धक्का होता.

परंतू या बिकट परिस्थितीमध्ये देखील श्री. सुधीरजी कलिंगण यांचे ज्येष्ठ सुपूत्र श्री. सिद्धेश कलिंगण यांनी ‘अजिंक्यतारा’च्या प्रमुख भुमिकेची जबाबदारी स्विकारली.

नाट्यमंडळ आणि प्रमुख भुमिका ही खर तर फार मोठी कसरत होती. पण नटश्रेष्ठ सुधीरजींच्या सुपुत्राने या सर्व अडचणींवर मात करत हे नाट्यप्रयोग यशस्विरित्या सुरूच ठेवले.

अर्थात यासाठी ट्रिकसिन्सची जबाबदारी सांभाळणारे त्यांचे बंधु कौस्तूभ कलिंगण, कलिंगण कुटूंबियांच्या जवळपास तीन्ही पिढ्याचा अनुभव गाठीशी असणारे तालरक्षक राजू कलिंगण, ज्येष्ठ लेखक-अभिनेते दादा राणे-कोनसकर व नाट्य मंडळातील इतर सर्वच सदस्यांची मोलाची साथ त्यांना लाभली हे सिद्धेशजी अत्यंत विनम्रतापुर्वक नमुद करतात.

सध्याच्या ट्रिकसिन्सयुक्त नाट्यप्रयोगांचे ‘बजेट’ हे नेहमीच फार जास्त असते. ग्रामीण भागातील नाट्यप्रयोगांचा विचार करता ते आयोजकांना सहज परवडणारे नसते. तरीसुद्धा जर ‘अजिंक्यतारा’ या दशावतारातील ‘बिग बजेट’ नाटकाचे तब्बल ‘पन्नास’ नाट्यप्रयोग होत असतील तर ती ‘सुवर्ण महोत्सवी’ कामगिरीच म्हणावी लागेल.

हा विक्रमी पन्नासावा नाट्यप्रयोग आयोजित करण्याचे भाग्य श्री देवी सातेरी परीसर युवक संघटना, देऊळवाडी, पेंडूर यांना लाभले.

त्यांनीही मग याच सुवर्णयोगाचे औचित्य साधून दशावतार नाट्यकलेमध्ये योगदान देत असलेल्या तब्बल 30 दिग्गज कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित केला. त्याचबरोबर पेंडूरमधील जूने जाणते संगीत क्षेत्रातील कलावंत यांचाही सत्कार करण्यात आला.

सत्कार करण्यात आलेले कलाकार..अनिल घावनळकर, अरूण राणे, बाबा मेस्त्री, कांता मेस्त्री, भास्कर सामंत, संतोष रेडकर, श्रीधर मुळीक, पप्पू नांदोसकर, बाबी वेतोरेकर, सुरेश धुरी, दिलीप मेस्त्री, ओमप्रकाश चव्हाण, यशवंत तेंडोलकर, विजय नालंग, चंद्रकांत माडये, भाई कलिंगण, सुधिर तांडेल, प्रशांत मेस्त्री, अभिमन्यू लाड, बाळा सावंत, बाबली नाईक, दादा कोनसकर, विलास गवस, विलास तेंडोलकर, बाळ कलिंगण, प्रशांत रेवडेकर, सुरेश गुरव, पुंडलिक मोर्ये, सिद्धेश कलिंगण इत्यादि दशावतार कलावंत व संगीत क्षेत्रातील कलावंत यांना सन्मानित करण्यात आले.

शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेरूर गावचे सुपूत्र सुप्रसिद्ध निवेदक श्री. निलेशजी गुरव यांनी केले. त्यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली.

‘अजिंक्यतारा..एका अजिंक्य योद्ध्याची..अजिंक्य कथा..!!’ या नाट्यप्रयोगाचा आनंद लुटण्यासाठी रसिक प्रेक्षकांचा जनसागरच जणू लोटला होता.

या कार्यक्रमासाठी पेंडूर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व मंडळातील सर्व सभासद उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

लोकराजा नटसम्राट श्री. सुधीर कलिंगण संचलित श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांची अनोखी 'सुवर्ण' कामगिरी..!!

दशावतार नाट्यकलेतील दिग्गज कलाकारांचा सत्कार सोहळा..!!

कुडाळ । देवेंद्र गावडे
बुधवार । २६ मे, २०२२

विशेष वृत्त :

लोकराजा नटसम्राट श्री. सुधीर कलिंगण संचलित श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाने विक्रमी कामगिरी करत 'अजिंक्यतारा' या ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोगाचा विक्रमी ५०वा नाट्यप्रयोग पेंडूर देऊळवाडी येथे, बुधवार २५ मे रोजी रात्रौ नऊ वाजण्याच्या सुमारास सादर करत नाट्यप्रयोगांचे 'अर्धशतक' गाठले.

मास्टर दादा राणे कोनसकर व राम राणे कोनसकर लिखित आणि दशावतार नाट्यकलेचे मानबिंदू नटसम्राट लोकराजा श्री. सुधीरजी कलिंगण यांच्या अभिनयाने अजरामर झालेली ही नाट्यकलाकृती सध्या सिंधुदुर्ग, गोवा परिसरात यशस्वीरित्या घोडदौड करत आहे.

या 'अजिंक्यतारा' नाटकाच्या 'सुवर्ण' कारकिर्दिला अश्रूंच्या ओलाव्याची देखील किनार आहे.

प्रतीवर्षीप्रमाणे श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे मालक श्री. सुधीरजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच मुख्य भुमिकेने नटलेल्या 'अजिंक्यतारा' नाट्यप्रयोगांची सुरूवात झाली खरी..पण स्वतःच्या उत्तम कलागुणांच्या..अदाकारीच्या जोरावर दशावतार नाट्यकलेतील अढळपद मिळवलेला हा 'अजिंक्यतारा' श्री. सुधीरजी कलिंगण यांनी मात्र अकाली 'एक्झिट' घेतली.

दशावतार नाट्यक्षेत्रावर..पर्यायाने कलेश्वर दशावतार नाट्यमंडळावर दुःखाचे आभाळ कोसळले. करोना महामारीच्या भिषणतेतून नुकत्याच सावरू पहाणा-या दशावतार नाट्यक्षेत्राला हा फार मोठा धक्का होता.

परंतू या बिकट परिस्थितीमध्ये देखील श्री. सुधीरजी कलिंगण यांचे ज्येष्ठ सुपूत्र श्री. सिद्धेश कलिंगण यांनी 'अजिंक्यतारा'च्या प्रमुख भुमिकेची जबाबदारी स्विकारली.

नाट्यमंडळ आणि प्रमुख भुमिका ही खर तर फार मोठी कसरत होती. पण नटश्रेष्ठ सुधीरजींच्या सुपुत्राने या सर्व अडचणींवर मात करत हे नाट्यप्रयोग यशस्विरित्या सुरूच ठेवले.

अर्थात यासाठी ट्रिकसिन्सची जबाबदारी सांभाळणारे त्यांचे बंधु कौस्तूभ कलिंगण, कलिंगण कुटूंबियांच्या जवळपास तीन्ही पिढ्याचा अनुभव गाठीशी असणारे तालरक्षक राजू कलिंगण, ज्येष्ठ लेखक-अभिनेते दादा राणे-कोनसकर व नाट्य मंडळातील इतर सर्वच सदस्यांची मोलाची साथ त्यांना लाभली हे सिद्धेशजी अत्यंत विनम्रतापुर्वक नमुद करतात.

सध्याच्या ट्रिकसिन्सयुक्त नाट्यप्रयोगांचे 'बजेट' हे नेहमीच फार जास्त असते. ग्रामीण भागातील नाट्यप्रयोगांचा विचार करता ते आयोजकांना सहज परवडणारे नसते. तरीसुद्धा जर 'अजिंक्यतारा' या दशावतारातील 'बिग बजेट' नाटकाचे तब्बल 'पन्नास' नाट्यप्रयोग होत असतील तर ती 'सुवर्ण महोत्सवी' कामगिरीच म्हणावी लागेल.

हा विक्रमी पन्नासावा नाट्यप्रयोग आयोजित करण्याचे भाग्य श्री देवी सातेरी परीसर युवक संघटना, देऊळवाडी, पेंडूर यांना लाभले.

त्यांनीही मग याच सुवर्णयोगाचे औचित्य साधून दशावतार नाट्यकलेमध्ये योगदान देत असलेल्या तब्बल 30 दिग्गज कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित केला. त्याचबरोबर पेंडूरमधील जूने जाणते संगीत क्षेत्रातील कलावंत यांचाही सत्कार करण्यात आला.

सत्कार करण्यात आलेले कलाकार..अनिल घावनळकर, अरूण राणे, बाबा मेस्त्री, कांता मेस्त्री, भास्कर सामंत, संतोष रेडकर, श्रीधर मुळीक, पप्पू नांदोसकर, बाबी वेतोरेकर, सुरेश धुरी, दिलीप मेस्त्री, ओमप्रकाश चव्हाण, यशवंत तेंडोलकर, विजय नालंग, चंद्रकांत माडये, भाई कलिंगण, सुधिर तांडेल, प्रशांत मेस्त्री, अभिमन्यू लाड, बाळा सावंत, बाबली नाईक, दादा कोनसकर, विलास गवस, विलास तेंडोलकर, बाळ कलिंगण, प्रशांत रेवडेकर, सुरेश गुरव, पुंडलिक मोर्ये, सिद्धेश कलिंगण इत्यादि दशावतार कलावंत व संगीत क्षेत्रातील कलावंत यांना सन्मानित करण्यात आले.

शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेरूर गावचे सुपूत्र सुप्रसिद्ध निवेदक श्री. निलेशजी गुरव यांनी केले. त्यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली.

'अजिंक्यतारा..एका अजिंक्य योद्ध्याची..अजिंक्य कथा..!!' या नाट्यप्रयोगाचा आनंद लुटण्यासाठी रसिक प्रेक्षकांचा जनसागरच जणू लोटला होता.

या कार्यक्रमासाठी पेंडूर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व मंडळातील सर्व सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!