बांदा | राकेश परब : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे स्थलांतरित कामगारांसाठी वैद्यकीय शिबिराचे काल आयोजन करण्यात आले होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एचआयव्हीचा स्थलांतरित कामगारांच्या माध्यमातून होणारा प्रसार रोखण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सिंधदुर्ग जिल्ह्यात मासेमारी, बांधकाम आणि आंबा, काजू सारखी शेती असल्यामुळे स्थलांतरित कामगारांची संख्या अधिक आहे. स्थलांतरित कामगारांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने एचआयव्ही सारख्या रोगांची लक्षणे त्यांच्या लक्षात येत नाहीत. अशा रोगाच्या संसर्गाची माहिती लपवणे त्यामुळे उदभवणारे धोके आणि मृत्यू ओढवू नये यासाठी कामगारांना संस्थेच्या माध्यमातून समुपदेशन करून जन जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स साथीच्या होणाऱ्या वाढीवर लक्ष ठेवणे हे हि यातील एक उद्देश आहे.
एड्सच्या होणाऱ्या वाढीवर नियंत्रण मिळवता येईल.
काल झालेल्या कुडाळ येथील वैद्यकीय शिबिरात ५५ स्थलांतरित कामगारांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर अजिंक्य शिंदे, सल्लागार मानसिंग पाटील आणि समीर शिर्के, आरोग्य समन्वयक धनंजय फुकट, दिलीप गावडे, प्रदीप पवार, देवानंद कुबल ओमकार पारकर आणि पर्यवेक्षक अधिकारी अवंती गवस आदी उपस्थित होते.