आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित.
‘जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाची केली जाणार सुरुवात..!
चिंदर | विवेक परब : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्यावतीने पिंगुळी येथील ग्रामपंचायत बाल उद्यान हॉल येथे शुक्रवार २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पिंगुळी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीमध्ये ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. या बैठकीला आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर मार्गदर्शन करणार आहेत तसेच या बैठकीला किसान मोर्चाचे समन्वयक प्रदीप आडगांवकर, प्रदेश चिटणीस रोहित चिवते, जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित राहणार आहे.