आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत असल्याचे सांगून केला प्रवेश..
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस मा. आरिफ बगदादी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली रामेश्वर वि.का.स. सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नेते आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस अरिफ बगदादी यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. तसेच अरिफ बगदादी हे सर्व विकास कामांबरोबरच लोकांचे आरोग्य विषयक गंभीर प्रश्न देखील सोडावीत असतात. सर्वसामान्य लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या दूर करण्यात देखील बगदादी यांचा हातखंडा आहे. म्हणून सर्वच लोकांना ‘आरिफभाई’ हे आपल्या घरातील सदस्य आहेत असे वाटते.
म्हणूनच आरिफ बगदादी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भाजपा मध्ये प्रवेश करत आहोत असे सर्व प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
या प्रसंगी रामेश्वर सरपंच मा. विनोद सुके, पं. स. माजी उप सभापती आणि विद्यमान चेअरमन नासिर मुकादम, प्रकाश पुजारे तसेच सोसायटीचे सर्व संचालक आणि गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.