चौके ग्रामस्थांतर्फे आयोजीत कै.सचिन (आप्पा)गावडे यांच्या स्मरणार्थ आयोजीत क्रिकेट स्पर्धा..
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके गांवच्या रेवटीवाडी येथील रेवटीच्या भव्य मैदानावर चौके ग्रामस्थांतर्फे आयोजीत कैलासवासी सचिन (आप्पा) गावडे यांच्या स्मरणार्थ आयोजीत 40 वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला.
अतिशय विस्तीर्ण अशा रेवटीच्या मैदानावर आलीशान समालोचन कक्ष तथा स्वागत कक्ष तसेच खेळाडूंसाठी मंडप ही या टेनिस बाॅल स्पर्धेची वैशिष्टये आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन चौके सरपंच श्री राजा गावडे ,पंचायत समिती सदस्या मनिषा वराडकर, व्यावसायिक अविनाश गावडे, माजी शिक्षक सदाशीव गावडे, जागा मालक पाटणकर आणि मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी काही माजी ज्येष्ठ खेळाडूंची खेळपट्टीवर गोलंदाजी व फलंदाजी हे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे एक वैशिष्ट्य ठरले. उद्घाटनाआधी खेळपट्टीवर पारंपारिक पद्धतीने गार्हाणे घालण्यात आले.
उद्गाटन समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री संतोष गावडे यांनी केले.यावेळी मंचावर चौके सरपंच श्री राजा गावडे,पं.स.सदस्य मनिषा वराडकर, सदाशीव गावडे,अविनाश गावडे, मोहन गावडे,राजन सारंग, मधुकर चौकेकर,राघो गावडे, बाळा गावडे,चंदन कांबळी,कमलाकर गावडे, शामसुंदर मेस्त्री,भाऊ चव्हाण, काका वरावडेकर,हेमंत चव्हाण,गुरु चव्हाण, नितीन गावडे,सच्चिदानंद गावडे,सुरेश चौकेकर,अनंत गावडे,श्रीधर नाईक, शाम वाककर,पुरुषोत्तम पाटणकर,पराग गावडे,निलेश गावडे,विजय गावडे , मालवणचे लेदरबाॅल प्रशिक्षक व खेळाडू हेमेंद्र मेस्त, सुशील मोर्ये,कमलेश गोवेकर,किरण गावडे,राजन सारंग,गणेश डिचोलकर,प्रशांत गावडे, संतोष गावडे,अतुल चौकेकर,गणेश गावडे, आयोजक सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील सामन्यात पंच म्हणून काका वरावडेकर,मकरंद सामंत काम पाहतील व गुणलेखनाची जबाबदारी गणेश राऊळ,चंदन कांबळी यांच्याकडे आहे.
या स्पर्धेच्या विजेत्याला 15555 बक्षिस व चषक तर उपविजेत्या संघाला 11111 रुपयांची बक्षिस व चषक देण्यात येणार असून उपांत्य फेरीतील संघांना देखील आकर्षक चषक व रोख इनाम देण्यात येणार आहे.
मालिकावीराला 2222 व चषक ,उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज व क्षेत्ररक्षकाला 1,111 रुपये रोख व चषक देण्यात येणार आहेत.
उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल.
या स्पर्धेविषयी आयोजकांतर्फे काय सांगण्यात आले ते पाहू.