वृध्दांसाठी करमणूक म्हणून नाट्यप्रयोग सादर..!
चिंदर | विवेक परब : श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था सिंधुदुर्ग व मुंबई यांच्या माध्यमातून कुडाळ येथील वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले . यावेळी वृध्दांना करमणूक म्हणून नाट्यप्रयोग सादर करण्यात आल्याने वृध्दाश्रमातील वृध्दांनी समाधान व्यक्त केले आहे.
श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात १५ मुद्दे घेऊन निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

शुक्रवार दिनांक २२ एप्रिल २०२२ ला जीवन संजीवन सेवा ट्रस्ट,आनंदाश्रय अणाव, तालुका कुडाळ येथील आनंदाश्रयामध्ये जात गराजलो रे गराजलो टीमने मनोरंजनपर कार्यक्रम सादर केला.वृद्धाश्रमातिल वृद्ध बाहेर जाऊन कार्यक्रम बघु शकत नाही.म्हणून गराजलो रे गराजलो टीमने तिथेच जाऊन कार्यक्रम करण्याचे आयोजित करण्यात आले होते . तिथे उपस्थित सर्व ज्येष्ठांनी संस्थेचे पदाधिकारी व इतरांबद्दल समाधान व्यक्त केले
श्री सोमेश्वर कलामंचचे संस्थापक अध्यक्ष श्री सहदेव धर्णे व सहकारी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील केले. श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो एक चळवळ द्वारे आनंदाश्रय हे आपले कुटुंब आहे. त्याप्रमाणे यापुढे नक्कीच जे जे करता येईल ते ते करु अशी ग्वाही यावेळी संस्थेचे अध्यक्ष सहदेव धर्णे यांनी दिली आहे.