27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

एक कळकळ…एक भाबडी तळमळ..! ( सहसंपादक संतोष साळसकर वाढदिवस विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

आपली सिंधुनगरी चॅनेल समूह | वाढदिवस विशेष : आजची पत्रकारिता साधनांनी सक्षम होत जाणारी आहे. साधने प्राप्त करण्यासाठी धडपड, श्रम आणि वेळ व पैसा जरुर लागतो पण ती साधने तोच मिळवू शकतो ज्याला आपण पत्रकार आहोत अशी जाणीव घट्ट रुजलेली असते.
आधी युवा वयातील जग जाणण्याची इच्छा किंवा हौस…नंतर एक सामाजिक सन्मान…आणि नंतर नंतर तर संपूर्ण समरसता अशा अवस्थेतून एक ग्रामीण तथा स्थानिक पत्रकार जातो असे म्हणणे वावगं ठरणार नाही.

या अवस्थेसोबतच एक अवस्था असते ती म्हणजे भाबडेपणा. सर्व समजत असते…आसपासच्या सर्वांचे स्वभाव कळत असतात आणि त्याचसोबत कोणालाही “नाही” म्हणायला मन राजी होत नसते अशा पत्रकार माणसाला संतोष साळसकर म्हणावे लागेल.

आधुनिक डिजिटल पत्रकारितेची सुद्धा धडपड आणि तळमळ यांना त्यांचे घरचे भौगोलिक स्थान आणि दूरसंचार संबंधीत प्रतिकूलता असूनही ते त्यांची इच्छेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

वीस वर्ष पत्रकारिता अक्षरशः एखाद्या सपाट्याने केल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरची स्थिती ही नक्कीच भक्कम करुन ठेवली असणार असा बहुतांश लोकांचा पत्रकारितेच्या विषयीचा अंदाज असूही शकेल परंतु तो अंदाजच ठरेल कारण पैसा जोडणी आणि पत्रकारिता त्यांचा पिंड नसतो.
संतोष साळसकर यांच्यासारखे आणखीही काही पत्रकार नक्कीच आहेत ज्यांच्या चांगुलपणाबद्दल समाज जाणत असतो परंतु कुठलीच वायफळ उपद्रवक्षमता त्यांच्यात त्यांनी दाखवली नसल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीकडे समाज फारशा गांभीर्याने पहात नाही.
प्रसंगी कुटुंबियही विचारत असतीलच “तुम्हाला पत्रकारितेने काय दिलं आजपर्यंत..? तो अमूक व्यवसाय बघा…तो तमूक माणुस बघा…” किंवा ” एवढाच वेळ व श्रम अमूक कामाला दिले असता तर ….” वगैरे.
पण कुटुंबियांना मनातून हे ही माहीत असते की ” आपले नाणे अस्सल आहे….आपला माणुस पत्रकार आहे .!”

संतोष साळसकर यांच्यासारख्या पत्रकाराला झोप प्रापंचीक विवंचनेमुळे कमी लागत असेलही परंतु जितकी लागते तितकी ‘शांत’ लागते हे ही खरे.
सच्च्या पत्रकाराला माहीत असते की पत्रकारितेने काय दिले…!
त्याचा आटापिटा व तळमळ हेच त्याचे दागिने तो दिमाखाने मिरवत असतो…..संतोष साळसकर यांच्यासारखे.

आजच्या युगातल्या पत्रकाराची गरज नेटका प्रपंचही आहे. आजच्या सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार म्हणून ‘ॲक्टीव्ह’ अशा सामाजिक प्रेमाच्या ओळखीसोबत त्यांची “प्रो ॲक्टीव्ह” अशी ओळख होत जावी आणि मायबाप समाजाला ती लक्षात यावी अशाच त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या भरपूर सदिच्छा.

भाबड्या पत्रकारालाही पोट असते…..शोधपत्रकारालाही कौटुंबिक गरजा असतात. समाजाला माहिती पोचावी असे वाटत असते तशीच हीसुद्धा एक माहितीच आहे.

बाकी कोणी कौतुक व प्रशंसा करावी म्हणून सहसा कोणताच पत्रकार उत्सुक नसतो उलट तो जगाने प्रशंसा करावेत असे कोणते घटक आहेत ते सर्वांना दाखवत असतो.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सहसंपादक श्री संतोष साळसकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुयोग पंडित ( संस्थापक व मुख्य संपादक आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आपली सिंधुनगरी चॅनेल समूह | वाढदिवस विशेष : आजची पत्रकारिता साधनांनी सक्षम होत जाणारी आहे. साधने प्राप्त करण्यासाठी धडपड, श्रम आणि वेळ व पैसा जरुर लागतो पण ती साधने तोच मिळवू शकतो ज्याला आपण पत्रकार आहोत अशी जाणीव घट्ट रुजलेली असते.
आधी युवा वयातील जग जाणण्याची इच्छा किंवा हौस…नंतर एक सामाजिक सन्मान…आणि नंतर नंतर तर संपूर्ण समरसता अशा अवस्थेतून एक ग्रामीण तथा स्थानिक पत्रकार जातो असे म्हणणे वावगं ठरणार नाही.

या अवस्थेसोबतच एक अवस्था असते ती म्हणजे भाबडेपणा. सर्व समजत असते…आसपासच्या सर्वांचे स्वभाव कळत असतात आणि त्याचसोबत कोणालाही "नाही" म्हणायला मन राजी होत नसते अशा पत्रकार माणसाला संतोष साळसकर म्हणावे लागेल.

आधुनिक डिजिटल पत्रकारितेची सुद्धा धडपड आणि तळमळ यांना त्यांचे घरचे भौगोलिक स्थान आणि दूरसंचार संबंधीत प्रतिकूलता असूनही ते त्यांची इच्छेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

वीस वर्ष पत्रकारिता अक्षरशः एखाद्या सपाट्याने केल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरची स्थिती ही नक्कीच भक्कम करुन ठेवली असणार असा बहुतांश लोकांचा पत्रकारितेच्या विषयीचा अंदाज असूही शकेल परंतु तो अंदाजच ठरेल कारण पैसा जोडणी आणि पत्रकारिता त्यांचा पिंड नसतो.
संतोष साळसकर यांच्यासारखे आणखीही काही पत्रकार नक्कीच आहेत ज्यांच्या चांगुलपणाबद्दल समाज जाणत असतो परंतु कुठलीच वायफळ उपद्रवक्षमता त्यांच्यात त्यांनी दाखवली नसल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीकडे समाज फारशा गांभीर्याने पहात नाही.
प्रसंगी कुटुंबियही विचारत असतीलच "तुम्हाला पत्रकारितेने काय दिलं आजपर्यंत..? तो अमूक व्यवसाय बघा…तो तमूक माणुस बघा…" किंवा " एवढाच वेळ व श्रम अमूक कामाला दिले असता तर …." वगैरे.
पण कुटुंबियांना मनातून हे ही माहीत असते की " आपले नाणे अस्सल आहे….आपला माणुस पत्रकार आहे .!"

संतोष साळसकर यांच्यासारख्या पत्रकाराला झोप प्रापंचीक विवंचनेमुळे कमी लागत असेलही परंतु जितकी लागते तितकी 'शांत' लागते हे ही खरे.
सच्च्या पत्रकाराला माहीत असते की पत्रकारितेने काय दिले…!
त्याचा आटापिटा व तळमळ हेच त्याचे दागिने तो दिमाखाने मिरवत असतो…..संतोष साळसकर यांच्यासारखे.

आजच्या युगातल्या पत्रकाराची गरज नेटका प्रपंचही आहे. आजच्या सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार म्हणून 'ॲक्टीव्ह' अशा सामाजिक प्रेमाच्या ओळखीसोबत त्यांची "प्रो ॲक्टीव्ह" अशी ओळख होत जावी आणि मायबाप समाजाला ती लक्षात यावी अशाच त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या भरपूर सदिच्छा.

भाबड्या पत्रकारालाही पोट असते…..शोधपत्रकारालाही कौटुंबिक गरजा असतात. समाजाला माहिती पोचावी असे वाटत असते तशीच हीसुद्धा एक माहितीच आहे.

बाकी कोणी कौतुक व प्रशंसा करावी म्हणून सहसा कोणताच पत्रकार उत्सुक नसतो उलट तो जगाने प्रशंसा करावेत असे कोणते घटक आहेत ते सर्वांना दाखवत असतो.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सहसंपादक श्री संतोष साळसकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुयोग पंडित ( संस्थापक व मुख्य संपादक आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

error: Content is protected !!