सिंधुदुर्ग संस्कृतीच्या ‘कोकण खाद्य महोत्सव 2022 महोत्सवाचेही’ आयोजन.
सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रेटिजची उपस्थिती आणि परफाॅरमन्सेस..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या हिंदळे – मोर्वे येथे ‘ कोकणचा डान्सिंग सुपरस्टार 2022 व कोकण खाद्य महोत्सव’ आयोजीत करण्यात आला आहे.

‘समृद्धी महिला गृह उद्योग देवगड’ यांच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज़ सेलिब्रेटिज,स्थानिक सेलिब्रिटीज आणि नामवंत कलाकार तसेच समाजप्रीय व्यक्तिंची उपस्थिती हे या महोत्सवाचे आकर्षण आहे.

कोकणातील व जिल्ह्यातील स्थानिक प्रतिभावंतांची सादरीकरणे,दशावतार यांसोबत फाॅरेनर महिलांची फुगडी व पारंपारिक नृत्याचे आयोजन हा सुद्धा या कार्यक्रमाचा औत्सुक्याचा विषय ठरतोय.

‘समृद्धी महिला गृह उद्योग’ ही एक महीलांसाठीची संस्था असुन गेली 4 वर्षे त्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे.या संस्थेच्या माध्यमातून काही गरजू महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही संस्था कोरोना महामारी नंतर पुन्हा एकदा नव्याने आपली सुरवात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे दिनांक १ व २ मे २०२२ रोजी होणाऱ्या”कोकणचा डान्सिंग सुपरस्टार” या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे.यासाठी काही दानशुर व्यावसायिक संस्थानी सहकार्य केले आहे….व यापुढेही ते अपेक्षीत आहे कारण समाजातील सक्षम स्त्रियांचा आकडा वाढला तरच कौटुंबिक,सामाजिक व देशाचे भविष्य आणखी उज्वल होऊन टिकेल अशी संस्थेची धारणा आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचाही सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून,कोकणातून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीतजास्त लोकांनी या उपक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ,कार्यक्रमांचा आष्वाद घ्यावा व आपणास जमेल ती मदत देखील करावी असे विनम्र आवाहन ‘समृद्धी महिला गृह उद्योग’ च्या अध्यक्षा आर.यु.तारी यांनी केले आहे.
दिनांक 1 आणि 2 मे दिवशी रंगणार्या या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक,सामाजिक,साहित्यिक,औद्योगिक क्रिडा व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वागतासाठी हिंदळे मोर्वे येथे ‘समृद्धी महिला गृह उद्योग’ अत्यंत अगत्याने सज्ज असल्याचेही संस्थेच्या सदस्यांनी व आयोजकांनी सांगितले आहे.
कोकणवखाद्य महोत्सवातील स्टाॅल्सचेही आकर्षण व उत्सुकता आता शीगेला पोहोचत आहे.
अधिक माहितीसाठी व पुरस्कर्ता नोंदणीसाठी 08275785710 /7709047674 / 9146095735 या क्रमांकांवर संपर्क साधून या भव्य सामाजिक सक्षमतेच्या उपक्रमाशी जोडले जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.