वैभववाडी | नवलराज काळे : भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.असे प्रतिपादन माजी समाजकल्याण सभापती तथा महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे यांनी केले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कांबळे बोलत होत्या.यावेळी संघाचे मुंबई अध्यक्ष यशवंत यादव, ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष सुनिल कांबळे, सुभाष कांबळे, सरचिटणीस रविंद्र पवार, रुचिता पवार,माजी उपाध्यक्ष संजय जाधव, दिपक कांबळे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, नगरसेवक सुप्रिया तांबे,राजन तांबे, संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व डाॅ. आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात धम्म पूजापाठ संघटनेचे बौध्दउपासक संतोष कदम,महेंद्र यादव, सुरेंद्र यादव, विश्वास पेडणेकर यांनी केला.त्यानंतर डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून भव्य अभिवादन रॕली काढण्यात आली.या रॅलीत अबाल वृध्द शुभ्र वस्त्रे परिधान करुन सहभागी झाले होते.महामानवांच्या नावांचा जयघोष करीत वैभववाडी शहर दणाणून सोडले.अभिवादन रॕलीत डाॕक्टर्स फॕटर्निटी क्लब जिल्हाध्यक्ष तथा वाभवे वैभववाडी चे नगरसेवक राजेंद्र पाताडे, उपसभापती अरविंद रावराणे यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
त्यानंतर प्रबोधनात्मक सत्यशोधक ‘शाहिरी जलसा’ हा कार्यक्रम शाहीर योगेश सकपाळ यांच्या पथकाने सादर केला. या कार्यक्रमाला सर्वांनी दाद दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शरद कांबळे यांनी केले.